Home अमरावती बडनेरा लागत असलेल्या जंगलात अमरावतीच्या इंजिनिअरिंगच्या तरुणीचा गळा चिरून खून! तरुणी गंभीर...

बडनेरा लागत असलेल्या जंगलात अमरावतीच्या इंजिनिअरिंगच्या तरुणीचा गळा चिरून खून! तरुणी गंभीर जखमी.

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0036.jpg

बडनेरा लागत असलेल्या जंगलात अमरावतीच्या इंजिनिअरिंगच्या तरुणीचा गळा चिरून खून! तरुणी गंभीर जखमी.

अमरावती
पी.एन. देशमुख.
ब्युरो चिफ रिपोर्टर.
दैनिक युवा मराठा नेटवर्क
अमरावती/बडनेरा
अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवे लगतच्या वडूला जंगलात परिसरात अभियांत्रिकीला शिकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा अतिशय निर्दयपणे गळा चिरून खून झाला असून, अभियांत्रिकाचा तरुण त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत पडून होता. हा थरार बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी समोर आला. ब्रेकअप नाट्यातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून सखोल तपास सुरू आहे. संजना शरद वानखडे (१९रा.परतवाडा) असे मृतक तरुणीचे तर सोहन गणेश ढाले (वय १९परतवाडा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. हे दोघेही बडनेरा येथील न्यू राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, बडनेरा प्रभारी ठाणेदार नितीन मगर, उपनिरीक्षक उमेश मारोडकर यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. बुधवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान ओढुर जंगलात एक तरुणी व एक तरुण रक्तबंबळ अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तरुणीचा मृत्यू झाला होता तर जखमी असलेल्या तरुणास शासकीय रुग्णालय अमरावती येथे उपचार करता दाखल करण्यात आले. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शिव विच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतक तरुणी व जखमी तरुण यांच्यात ब्रेकप वरून हे नाट्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संजना आणि सोहम हे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांची एकमेकांसोबत मैत्री होती मात्र तरुणीला त्याच्यासोबत मैत्री ठेवायची नव्हती, त्यामुळे तिने त्याला ब्रेकप ची मागणी केली होती असे समजते. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान तरुणाच्या डाव्या हातावर सुद्धा कटरने वार केल्याप्रमाणे जखम असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणीच्या गळ्यावर पाच वार, निर्दीयपणे गळा चिरल्याचे दिसून येत आहे. तरुणीच्या गडावर पाच वार असून, त्रिवार कट्यारणी केल्याप्रमाणे दिसत आहे. दरम्यान तरुणीने मारेकऱ्याच्या प्रतिकार केला असून त्यामध्ये तिच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अतिशय क्रूरपणे तरुणीचा खून झाला आहे. तरुणीची वडील निवृत्त पोलीस अंमलदार असून ते दोन महिन्यापूर्वीच अमरावती ग्रामीण पोलीस दलातून सेवानिवृत्ती झाले आहेत अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली आहे. पुढील खून प्रकरणी पोलीस स्टेशन बडनेरा टीम सत्य त्याची पडताळणी करून चौकशी व तपास करीत आहेत

Previous articleदेवळा तालुक्यात मोबाईल चाँर्जिगच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार
Next articleशासनाकडून कर्तबगार महिलाना ३१ मे रोजी मि़ळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here