• Home
  • *रावळगावच्या आठवणी आणि मुक्या प्राण्याची माया*

*रावळगावच्या आठवणी आणि मुक्या प्राण्याची माया*

*रावळगावच्या आठवणी आणि मुक्या प्राण्याची माया* नाशिक (विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- अचानक रावळगावची आठवण झाली आणी आपला गाव बरा गडे असे वाटू लागले, रावळगावी नोकरी करीत असताना २०१३ ऑगस्ट महिना रक्षा बन्धनाचा तो दिवस आज डोळ्यासमोर आला आणी मन बैचैन झाले ,रात्रीचा 1 वाजला असेल बाहेर मुसळ धार पाऊस पडत होता आणी आम्हाला बाहेर गार्डन मध्ये मांजराची पिल्ल्रे म्याव म्याव करीत असल्याचा आवाज आला दरवाजा उघडून पाहिला तर 2 पिल्ले पावसात भिजत होती चटकन त्याना घरात घेतले पावसात भिजून बिचारी चिमुकली थंडीने थडथड उडत होती, कुणी निर्दयी माणुस भर पावसात त्या मुक्या प्राण्याला सोडुन गेला होता खुप वाईट वाटले माणुस प्राण्याचे बुद्धी असुन असे का वागतात, कुडकुडनारी ती पिल्ले कपड्याने पुसुन कोरडी केली त्याना रात्री जेवन दिले आणी तेव्हापासून ती आमच्या कुटुंबाचे सदस्य झाले आणी मग 2 दिवसात ती माणसाळली आणी ती गोंडस दिसणारी पिले खेळू लागली मग आमचा तो दिनक्रम झाला पुढे हे कुटुंब वाढून ६ जनाचे मोठे कुटुंब झाले, बघा मुके प्राणी बुधि नसते तरी कसे वागतात त्याना त्यांचे डिश मध्ये जेवन दिल्या शिवाय कधी उघड्या दुधाचे पातेले असो किवा पोळीचा डबा कधी स्वतहून तोंड घातले नाही, कुत्री पण होती 2 आमच्या कॉलोनी मध्ये त्यांची ही यांच्याशी मैत्रि झाली ते एकत्र खेळताना पाहुन मन सुखावून जायचे, मांजराचे मी पाहिलेले अनुभव सांगतो उन्हाळ्याचे दिवस होते आणी लाईट गेलेली होती आणी बाहेर गार्डन मध्ये आमच्या मांजराचा गोंगाट जोरात आवाज आला म्हणून बाहेर येऊन बैटरी लावुन पाहिले तर भल्ला मोठा साप फुस फुस करीत होता त्याला आमच्या मांजरीनी चारी बाजुनी घेरले होते आपल्या पंजाचा नखाचा वापर करुन त्याला त्या जखमी करीत होत्या शेवटी त्याला मारुन टाकतील म्हणून मी काठीने सापाला दूर पळवले सांगण्याचा ऊद्देश असा की अतिशय प्रामाणिक व उपयुक्त असा हा जिव आहे येवढा लळा जिव लावल्या नंतर २०१८ ला मला रावळगाव सोडुन यावे लागले मित्रानो तो दिवस माझे कुटुंब कधी नाही विसरु शकत सामानाचा ट्रक भरत असताना ती सर्व आमच्या भोवती घुटमळत होती जणु घर खाली होते आहे आणी आपले मालक चालले आपल्याला सोडुन हे त्यांच्या केविलवाण्या नजरेत दिसत होते आमचे डोळे पाणावले क्षणभर वाटले घेवुन जावे याना सोबत पन आपण जाणार फ्लैट मध्ये तिथे कसे शक्य होईल आणी मग विचार सोडुन दिला, आजही आम्हाला त्यांची आठवण आली की मन गहिवरून येते, रावळगाव ला गेलो की मी माझ्या जुन्या घराकडे चक्कर मारतो नी त्याना शोधत असतो पन नाही दिसत ती गेली असतील कुठे अन्न पानी शोधत असतील बिचारे जिव,शोधून सापडत नाहित दरवेळी न भेटताच दुखी मनाने परत यावे लागते एक गोष्टीची मला शहरात जाणिव झाली आपले खेडे गाव या मधिल माणुसकीचे आंतर खुप मोठे आहे, ग्रामीण भागात माणूसकी अजुनही ओसंडून वाहत आहे
, मला हे सर्व लिहून एकच सांगायचे मित्रानो मुके प्राणी पशुपक्षी याना जिव लावा प्रेम दया खुप मोठे पुण्य आहे त्याना कधी मारु नका अन्न पाण्या पासुन वंचित ठेवू नका, त्यांचे वर केलेली दया हे खुप मोठे पुण्य आहे मंदिरात जाऊन तासन तास देवाचा ध्यास करने पेक्षा मुक्या प्राण्यात देव शोधा नक्कीच तुम्हाला देव भेटेल मी हे सांगतो आहे हे कित्येक लोकांना पटणार नाही कदाचीत चेष्टा ही होईल याची पण लक्षात ठेवा जो या मुक्या प्रणयाचा तळतळा घेईल त्याला परमेश्वर दरबारात हिशोब दयावा लागेल ते चुकणार नाही मग करा आजपासुन या मुक्या जिवावर दया , प्रेम तुम्हाला काही कमी पड्णार नाही धन्यवाद

anews Banner

Leave A Comment