• Home
  • 🛑 वादळी पावसात ट्रॅकवरच अडकली लोकल, 400 लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीमला केलं पाचारण 🛑

🛑 वादळी पावसात ट्रॅकवरच अडकली लोकल, 400 लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीमला केलं पाचारण 🛑

🛑 वादळी पावसात ट्रॅकवरच अडकली लोकल, 400 लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीमला केलं पाचारण 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 ऑगस्ट : ⭕ मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मस्जिद बंदर स्टेशनला दोन लोकल ट्रेन (Mumbai Local) अडकून पडल्या आहेत. ज्यामध्ये सुमारे 400 लोक अडकले आहेत. या लोकल मागे किंवा पुढे नेणं शक्य होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाटी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.

सीएसएमटी ते कर्जत आणि कर्जत ते सीएसएमटी अशा दोन ट्रेन ट्रॅकवर अडकल्या आहेत. सध्या एनडीआरएफची टीम दाखल झाली असून प्रवाश्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मुंबईत कोसळलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. जोरदार वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने मुंबईची दुरवस्था केली आहे. दक्षिण मुंबईत पावसाच्या झंझावाताने सर्वाधिक कहर केला. अनेक ठिकामी झाडं पडल्याने रस्ते बंद आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या पावसाळ्यात पहिल्यांदाच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दादर, हिंदमाता भागात तळं साठलं आहे. CSMT ते कुर्ला रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने वाशीकडे आणि कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूकही बंद आहे.

पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी पूर येण्याची शक्‍यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment