• Home
  • 🛑 दादरमध्ये फेरीवाले, मंडईतून होतो कोरोनाचा प्रसार 🛑

🛑 दादरमध्ये फेरीवाले, मंडईतून होतो कोरोनाचा प्रसार 🛑

🛑 दादरमध्ये फेरीवाले, मंडईतून होतो कोरोनाचा प्रसार 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 27 जुलै : ⭕ महापालिकेच्या जी- उत्तर विभागातीला दादर भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ०१ जुलै रोजी दादरमधील एकूण रुग्णांची संख्या ८७५ एवढी होती. परंतु २५जुलैपर्यंत ही संख्या १५८९ वर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे माहिमच्याही पुढे दादरची ही संख्या पोहोचलेली असून अवघ्या २५ दिवसांमध्येच दादरमध्ये साडेसातशे रुग्णांची भर पडलेली आहे. या भागात दादरमधील अनधिकृत फेरीवाले आणि पुन्हा सुरु केलेल्या मंड्याच कोरोनाच्या विषाणू संसर्गाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी दादर आणि धारावीमधील रुग्णांची संख्या वाढतच आहे. धारावीपाठोपाठ सर्वाधित जी-उत्तर विभागात सर्वांधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही माहिममध्ये होती. परंतु जुलै महिन्यात दादरने माहिमलाही मागे टाकले. मागील चार दिवसांमध्येच दादरमध्ये १४० रुग्ण आढळून आले आहेत. ३० जूनपर्यंत दादरमध्ये एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५४ एवढी होती. त्यावेळी माहिममध्ये एकूण रुग्णांची संख्या ११०८ एवढी होती.त्यामुळे त्यावेळी २५० रुग्ण संख्येने माहिम पुढे होते. परंतु २५ जुलैची आकडेवारी पाहता माहिममध्ये एकूण रुग्णांची संख्या १५८३वर पोहोचली आहे. तर दादरमधील संख्या १५८९ एवढी झाली आहे. त्यामुळे अवघ्या २५ दिवसांमध्ये दादरमध्ये साडेसातशे रुग्णांची भर पडली आहे.

दादरमध्ये मागील मंगळवारी सावरकर मंडईच्या बाहेरील बाजुस असलेल्या दुकानानाबाहेर एका हमालाचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्या समोरील पदपथावरही अशाचप्रकारे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याशिवाय किर्तीकर मंडईमध्येही तीन ते चार हमालांना सर्दी,खोकला व तापाची लक्षणे आढळून आले होते. त्यामुळे अशाप्रकारे कोरोनाबाधित हमालांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसून त्यांच्यामुळे मंडईंमध्ये येणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती वर्तवली जात आहे.

दादरमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉक-डाऊनमध्ये फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास बंदी आहे. तरीही दादरमधील सेनापती बापट मार्ग आणि रानडे मार्गावर फेरीचा व्यवसाय करत असतात. विशेष म्हणजे सकाळी भाजीसह इतर फेरीचा व्यवसाय करणारे भय्या हमाल हे या मंडईंमध्येच राहत असून ते योग्यप्रकारे आपल्या आरोग्याची काळजीही घेत नाही. आज मुंबईत ७० टक्के लक्षणे नसलेले कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मंडईंमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक असले तरी महापालिकेकडून त्याठिकाणी काळजी घेतली जात नाही. सावरकर मंडईचे पाचही प्रवेशद्वार कायमच सुरु असून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ही मंडई घाऊक आणि किरकोळ भाजी विक्रीसाठी खुलीच असतात. जर न्यायालयाने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी केलेली आहे, तर मग दादरमध्ये अशाप्रकारे फेरीवाले कसे व्यापार करतात,असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने मंडईमध्ये रात्रीच्या वेळी कुणालाही वास्तव्यास राहण्याची परवानगी देवू नये,अशी मागणीही होत आहे. दादरमध्ये सध्या अशाप्रकारच्या फेरीवाल्यांमुळे तसेच मंडईंमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दादरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ४८ दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर हा २ टक्क्यांवर आला आहे. तर दिवसाला सरासरी २५ रुग्ण आढळून येत आहे. विशेष म्हणजे माहिम आणि धारावीच्या तुलनेत दादरमधील रुग्ण दुप्प्ट होण्याचा कालावधी खूपच कमी आहे. या दोन्ही भागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा अनुक्रमे १०० व २५८ दिवस एवढा आहे. तर रुग्ण वाढीचा दर हा अनुक्रमे १ टक्का व ०.३७ टक्के एवढा आहे. तर सरासरी दिवसातील रुग्णांची संख्याही कमीच असून ती अनुक्रमे १५ रुग्ण व ९ रुग्ण एवढी आहे.⭕

anews Banner

Leave A Comment