• Home
  • पाच हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (A.C.B.) जाळ्यात अडकली

पाच हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (A.C.B.) जाळ्यात अडकली

राजेंद्र पाटील राऊत

anti-corruption-bueraue-video_647_091216031050.jpg

पाच हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (A.C.B.) जाळ्यात अडकली

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

पुणे, १५ – मे. न्यायालयात लवकर दोषारोपपत्र पाठविल्याच्या बदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ए.सी.बी.) ताब्यात घेतले.
ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात करण्यात आली.
श्रद्धा शरद अकोलकर (वय 35) असे ‘ए.सी.बी.’ने ताब्यात घेतलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.
याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने ‘ए.सी.बी.’कडे तक्रार केली होती.
तक्रारदाराच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
संबंधीत गुन्ह्यासंबंधीचे दोषारोपपत्र मे.न्यायालयात लवकर सादर करण्याची मागणी तक्रारदाराकडून केली जात होती.
दरम्यान, अकोलकर यांनी दोषारोपपत्र लवकर सादर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती.
त्यानंतर त्यांच्यामध्ये तडजोड झाली. तडजोडीनुसार, तक्रारदार यांनी अकोलकर यांना पाच हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
विभागाने या तक्रारीची पडताळणी केली.
त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सापळा रचला.
तेव्हा अकोलकर यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.
पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, पोलिस
पथकाने ही कारवाई केली.

anews Banner

Leave A Comment