Home मुंबई कोकण विकास समितीच्या माध्यमातून २ एस.टी बसेस सुरू 

कोकण विकास समितीच्या माध्यमातून २ एस.टी बसेस सुरू 

146
0

राजेंद्र पाटील राऊत

कोकण विकास समितीच्या माध्यमातून २ एस.टी बसेस सुरू
नालासोपारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नालासोपारा :-कोरोनाच्या महामारीमध्ये वाहतुकीची अनेक साधने बंद होती. नंतर हळूहळू गावी जाणाऱ्या ट्रेन चालू झाल्या परंतु ज्यांचे आरक्षण असेल त्याला प्रवास करता येणार आहे.रेल्वे स्थानक ते गाव असे अंतर जास्त असल्याने काही प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. अशा परिस्थितीत कोकण विकास समितीने पुढाकार घेऊन नालासोपारा ते खेड आणि नालासोपारा ते गुहागर अशा दोन एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत.नालासोपारा ते खेड एस टी नालासोपारा येथून रात्री १० वाजता सुटेल.नालासोपारा ते गुहागर एस टी नालासोपारा येथून रात्री ९ वाजता सुटेल.

नालासोपारा ते खेड एस टी चा मार्गे नालासोपारा -ठाणे-पनवेल-महाड-पोलादपूर-मार्गे गोळेगणी-कोतवाल-ओंबली- दहिवली-तळे-मार्गे खेड असा असेल.नालासोपारा ते गुहागर एस टी चा मार्गे नालासोपारा -ठाणे -पनवेल- महाड- विन्हेरे मार्गे -खेड -चिपळूण-गुहागर असा असेल.तसेस खेड -नालासोपारा एसटी खेड एस टी स्थानक मधून दुपारी 3 वाजता सुटेल.तसेच गुहागर -नालासोपारा एस टी गुहागर स्थानक मधून संध्याकाळी 7 वाजता सुटेल.तरी नालासोपारा ,वसई , विरार या शहरात राहत असलेल्या कोकण प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा. एस टी चालक वाहक यांचा कोकण विकास समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.विकास मोरे (गाव गोळेगणी, रा. विरार) आणि प्रमोद कदम (गाव फाळकेवाडी, रा. विरार)
,सचिन मोरे,रमेश मोरे, संदीप माने, अजित भोसले, आशिकेश माने, मयुरेश मोरे, साशंक माने, बबलू सुर्वे, रमेश चव्हाण, सौ दर्शना मोरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here