Home नांदेड मुखेड नगरीचे आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.

मुखेड नगरीचे आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.

252

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड नगरीचे आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. आज दिनांक 23 डिसेंबर रोजी मुखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, अभिचिंतन सोहळा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गज्जलवार यांच्या पुढाकारातून व गज्जलवार मित्र मंडळाच्या सहकार्यातून शहरातील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानामध्ये मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आव्हान आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांनी केले होते. मुखेड चे नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार व सर्व सन्माननीय नगरसेवकांनी या आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले होते. व आमदार साहेबांनी येणारा वर्ष सर्व मुखेड वासियांना सुख व समृद्धीचे जावो असे सांगून सर्वांचे  आभार मानले.    संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज देगलूर

Previous articleप्रयोगशील शेतकऱ्यांसाठीच्या पुरस्कारांमध्ये वाढ आता 63 ऐवजी 99 पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार
Next articleकोकण विकास समितीच्या माध्यमातून २ एस.टी बसेस सुरू 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.