Home गडचिरोली सावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन सांत्वन….

सावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन सांत्वन….

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0037.jpg

सावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन सांत्वन….

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ):– सावली येथील श्री.अंकुश मक्केवार यांची मुलगी काजल अंकुश मक्केवार वय १३ वर्ष वर्ग पाचवी मध्ये चांदाळा या ठिकाणी शिकत होती.सुट्टीच्या वेळी आपल्या स्वभावी आली असता असोलामेंढा या प्रकल्प नहराच्या पाटामध्ये पोहतांना अचानक काजलचा भाऊ पाण्यात बुडाल्याने तिने भावाचा जीव वाचवण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून अंत झाला.यामध्ये तिच्या भावंडासह पाच मुले होती पण चार मुलांना वाचवण्यात यश आले.पण आपल्या भावाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याने परिसरात सर्वत्र हडहड व्यक्त केले.

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी मृतकाच्या परिवारांची घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी मदत तात्काळ मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी तातडीने मदत देण्याचे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी नायब तहसीलदार यांना सूचना केल्या

याप्रसंगी खा.अशोकजी नेते. तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतीशजी बोमावार,शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, ठाणेदार बोरकर साहेब, नायब तहसीलदार कांबडी साहेब, प्रसाद जकुलवार, मयूर गुरनुले,अंकुश मक्केवार,मधुकर मेडपलीवार,संजय मेडपलीवार,पर्वताबाई मक्केवार शांताबाई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleरेपनपली जवळ खड्ड्यात टाकले सूरजागड ची लोहदगड..!! माजी.जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सुरजागळ वर रोष व्यक्त केले..!!
Next articleमालेगांव तालुक्यात घुगेच्या घरावर धाडसी दरोडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here