Home वाशिम मालेगांव तालुक्यात घुगेच्या घरावर धाडसी दरोडा

मालेगांव तालुक्यात घुगेच्या घरावर धाडसी दरोडा

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0002.jpg

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                           मालेगांव तालुक्यातील मेडशी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तराव बाबुराव घुगे यांच्या घरी दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना दिनांक ३ सप्टेबर रोजी मध्यरात्री दोन वाजता दरम्यन घडली दरोडे खोरांची चाहुल लागताच घरातील मंडळी जागे झाली यावेळी दत्तराव घुगे यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करत एकाला पकडले मात्र यावेळी दुसऱ्या एका दरोडा खोरांने दत्तराव घुगे यांच्या वर चाकुचे जबर घाव घातले जखमी अवस्थेत सुध्दा प्राणाची बाजी लावून घुगे यांनी दरोडेखोरांना पकडून ठेवले प्रसंगी घरातील सर्व जण व शेजारीचे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आल्याने दुसऱ्या एका दरोडेखोराला घरा बाहेर निघणे शक्य न झाल्याने घरमालकानी त्याला सुध्दा पकडून दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले गंभीर जखमी असलेल्या दत्ता घुगे वर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे गेल्या महिना भरा पुर्वी दत्ता घुगे यांच्याच घरी चोरट्यांनी चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता या घटनेचा तपास लागणे बाकी असतांनाच आज पुन्हा हि घटना घडल्याने मेडशी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेचा अधिक तपास मालेगाव पोलिस करत आहेत…

Previous articleसावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन सांत्वन….
Next articleगणेशपूर येथील दक्षिणमुखी गणपती दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here