Home Breaking News 🛑 अनलॉक-३: पाहा, जनतेला काय मिळू शकते सूट 🛑

🛑 अनलॉक-३: पाहा, जनतेला काय मिळू शकते सूट 🛑

140
0

🛑 अनलॉक-३: पाहा, जनतेला काय मिळू शकते सूट 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 27 जुलै : ⭕ काही दिवसांमध्ये म्हणजेच, येत्या ३१ जुलै रोजी अनलॉक-२ समाप्त होत असून, अनलॉक- ३ साठी एसओपी (standard operating procedure) बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्याक आली आहे. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक- ३ मध्ये चित्रपटगृहे उघडण्याची शक्यता आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात १ ऑगस्टपासून चित्रपटगृहे सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समजते.

यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि चित्रपटगृहांच्या मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर चित्रपटगृहांच्या मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह चित्रपटगृहे सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. असे असले तरी, सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकसंख्येसह चित्रपटगृहे सुरू करावीत आणि या काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा विचार आहे.

इतकेच नाही, तर अनलॉक -३ मध्ये चित्रपटगृहांसोबत जिम देखील उघडली जाण्याची शक्यता आहे. सूत्राच्या माहितीनुसार, या टप्प्यात शाळा आणि मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने विचार केला गेलेला नाही. त्याचबरोबर, राज्यांसाठी अनलॉक- ३ मध्ये आणखी काही सूट दिली जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये देशभरात लॉकडाउन लावण्यात आले. ते लॉकडाउन जूनपर्यंत चालले. ३० जून रोजी अनलॉक- १ अंतर्गत कोरोनाच्या संकटामुळे लावलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात झाला. त्यानंतर आर्थिक निर्बंध उठवले गेले. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक -२ सुरू झाला. हा टप्पा ३१ जुलै रोजी संपणार आहे.

मात्र, तत्पूर्वी अनलॉक -३ बाबत विचारविनिमय सुरू करण्यात येतील असे मानले जात होते. परंतु, गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तीव्र गतीने होणारी वाढ पाहता सरकार चिंतेत आहे. म्हणूनच, शाळा-महाविद्यालयांवरील असलेली बंदी सध्या कायम राहू शकते.

गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ झाली आहे. दररोज सुमारे ५० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार, कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या वाढून ती १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे. तथापि, देशात आतापर्यंत ८,८५,५७७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४,६७,८८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४८,६६१ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २४ तासात ७०५ लोक मरण पावले आहेत. यासह मृतांचा आकडा ३२,०६३ वर पोहोचला आहे.⭕

Previous article🛑 भारतात ५० लोकांना कोरोनाची लस…! निकालानं अपेक्षा वाढल्या.. 🛑
Next article🛑 दादरमध्ये फेरीवाले, मंडईतून होतो कोरोनाचा प्रसार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here