*सप्तशृंगी गडावर मा. आमदार गावित यांचे हस्ते गरजूंना किराणा व धान्याचे वाटप*
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
सध्या करोनाने सगळीकडेच थैमान घातले असल्याने सुरगाणा व कळवण तालुकाही त्यातून सुटलेले नाही. आज मितीस दोन्ही तालुके करोना मुक्त असले तरी लॉकडाउनमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार , छोटे दुकानदार यांची पुरती वाट लागली आहे.गेली अडीच महिने लॉक डाउन मुळे शेतकरी , कामगार, व छोटे दुकानदार घरीच असल्याने काय खावे असा गंभीर प्रश्न यांच्या पुढे पडलेला आहे. मेटाकुटीला आलेल्या जनतेला एकीकडे काम नाही अन दुसरीकडे पोटाला अन्न नाही. मात्र अशावेळी *शेतकरी व गरिबांचे कैवारी माजी आमदार जे पी गावित मदतीला धावून येत* त्यांच्या पुढाकाराने व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गोर गरीब व गरजू जनतेला *किराणा व धान्य मालाचे वाटप* सुरू केल्याने जनता माजी आमदार गावित यांना भरभरून आशीर्वाद देत आहे. सुरगाणा तालुक्यात सुरगाणा, बार्हे ,उंबरठाण , खिर्डी, पंगारणे ,भेगु आदी भागात हजारो गरजू लोकांना *सुरगाणा पंचायत समिती उपसभापती इंद्रजीत गावित यांनी स्वतः घराबाहेर पडत उपाशी लोकांना धीर देत* गावोगावी धान्याचे वाटप केले आहे.सुरगाणा तालुक्यात हजारो लोकांना त्यांचा आधार मिळाला. आता कळवण तालुक्यात सुरुवात केली असून *अष्टभुजा देवी सप्तशृंगी च्या पायथ्याशी गडावर मंगळवार दि 2 जून रोजी* कळवण तालुक्यातील कार्यकर्ते व समाजसेवक यांच्या सहकार्याने परिसरातील गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. *यावेळी माजी आमदार गावित म्हणाले की,* सुरगाणा तालुक्यात सुमारे 51 गावात गरजू लोकांना धान्य वाटप केले मेटाकुटीला आलेल्या गरीब ,शेतकरी व छोटे दुकानदार यांना धीर देण्याची गरज असून *सत्ता असो वा नसो समाज कार्य माझे चालूच राहते,* परिसरातील गरीब जनतेने *सोशिअल डिस्टन्स* चा वापर करीत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत किट मधील तांदूळ, गहू, तेल, कांदे, मीठ मिरची, सोयावडी, बेसन, साबण, इ, यांचा योग्य वापर करावा, स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू असे बी डी ओ बहिरम यांनी सांगितले. *लाभार्थीनीं माजी आमदार गावित साहेबांना भरभरून आशीर्वाद दिले.*
यावेळी किसनसभा जिल्हा अध्यक्ष सावळीराम पवार, सेक्रेटरी मोहन जाधव, राजू दादा आहेर, भरत शिंदे, बाळासाहेब गांगुर्डे, नगरसेवक अकिल पठाण, वसंत बागुल, डॉ महाजन, सुभाष राऊत,सचिन वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते,