Home भंडारा जिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १) डे नाईट क्रिकेट प्रतियोगिते चा...

जिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १) डे नाईट क्रिकेट प्रतियोगिते चा शुभारंभ

95

आशाताई बच्छाव

IMG_20240220_082322.jpg

जिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १)
डे नाईट क्रिकेट प्रतियोगिते चा शुभारंभ

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) तुमसर तालुक्यातील आष्टी, चीखला, डोंगरी बूज. या तीन जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत प्रथमच जिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १) टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट प्रतियोगिते चा भव्य शुभारंभ कऱण्यात आला.
जि. प. सदस्य आष्टी राजू देशभ्रतार व श्री महाकाल बहुउद्देशीय संस्था तुमसर यांच्या संयुक्त संकल्पनेतून तीन जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या ३६ गावातील क्रिकेट स्पर्धकांचे आय पी एल क्रिकेट प्रतियोगिता जिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १) आयोजन तालुक्यातील नरसिंग राव ग्राउंड आष्टी येथे कऱण्यात आले. प्रतियोगितेचे उद्घाटन रा. यु. काँ. ( शरद पवार गट) जिल्हा अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परीषद भंडारा चे उपाध्यक्ष तथा सभापती बांधकाम व अर्थ संदीप ताले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि प भंडारा चे सभापती कृषी व पशुसंवर्धन बाळू सेलोकर,जि. प. सदस्य एकनाथ फेंडर,नरेश ईश्वरकर ,
गोबरवाही पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक विनोद गिरी , मा उपसभापती प स तुमसर शिशुपाल गौपाले , अजय गहाणे, सरपंच ग्रा.पं. नाकाडोंगरी,सुमीत गौपाले, प स सदस्य नरेंद्र गेडाम ,भोजवंता धुर्वे ,तालुका प्रमुख उबाठा पवन खवास ,प्रदेश सचिव ए. एस. यू. आय. शुभम गभने , अनिल गौपाले , राहुल भुतांगे , डॉ. प्रशांत भैसारे, विजय राऊत, प्रितीताई सोनवाणे, श्रीराम पुष्पतोडे , ज्ञानेश्वर राऊत , अवकाश राऊत, ऋषीकुमार गौपाले, तिलक गौपाले, निलकंठ देशमुख, सियारामजी नागपूरे, खेळाडू, सर्व आयोजक व मोठया संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.

Previous articleसडक अर्जुनी येथे अखिल भारतीय अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न
Next articleमराठा आरक्षणासाठी महत्वाचा दिवस, आज विधानसभेचे विशेष अधिवेशन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.