Home मुंबई मराठा आरक्षणासाठी महत्वाचा दिवस, आज विधानसभेचे विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणासाठी महत्वाचा दिवस, आज विधानसभेचे विशेष अधिवेशन

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_104557.jpg

मराठा आरक्षणासाठी महत्वाचा दिवस, आज विधानसभेचे विशेष अधिवेशन.                               मुंबई,(विजय पवार)

राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या १० दिवसांपासूंन उपोषणाला बसले आहेत. तर त्या आधी त्यांनी नवी मुंबई पर्यंत धडक मोर्चा नेला होता. यावेळी सरकारने ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. या साठी विशेष अधिवेश देखील घेणार असल्याचे सरकारने म्हटले होते. त्यानुसार आज मंगळवारी विधानसभेचे विशेष अधिवेश बोलवण्यात आले असून सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडणार आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरू होईल. सकाळी ११ वाजता राज्यपाल विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात अभिभाषण करणार आहेत. एक दिवसीय अधिवेशनात फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. विधेयक मांडल्यानंतर फक्त गटनेत्यांना बोलू दिलं जाणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: मराठा आरक्षण विधेयकाचा मसूदा वाचणार आहेत.

दरम्यान, मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष अनिल सुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत अहवाल सरकारला नुकताच सादर केला आहे. यापूर्वी दोनदा केलेला मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकला नव्हता. या पार्श्वभूमीवर आता होणारा कायदा हा टिकेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ओबीसीच नव्हे, तर इतर कोणत्याच समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, कुणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन हा अहवाल स्वीकारतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होते. शिवनेरी गडावर देखील त्यांनी याचा पुनरुच्चार केला होता.

युवा मराठा न्युज/चॅनेल महाराष्ट्र राज्य
निर्भय पत्रकारितेचा दमदार आवाज युवा मराठा न्यूज महाराष्ट्र
बहुजन समाज चळवळीला समर्पित
www.yuvamarathanews.com

Previous articleजिल्हा परिषद प्रीमियर लीग ( सिझन १) डे नाईट क्रिकेट प्रतियोगिते चा शुभारंभ
Next articleशिवशक्ती मित्र मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here