Home नाशिक शिवशक्ती मित्र मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी

शिवशक्ती मित्र मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी

47
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_105028.jpg

सुदर्शन बर्वे (भगूर शहर प्रतिनिधी )
शिवशक्ती मित्र मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी
भगुर मधील शिवशक्ती मित्र मंडळाने साला बाद प्रमाणे या हि वर्षी सकल हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० महाराज्यांची भव्य मुर्तीचे वाजतगाजत आगमण सोहळा पार पडला या नंतर रात्री १२ वाजेला प्रतिमा पुजन व आरती करण्यात आली. या नंतर काल पहाटे ५ वाजेला महाअभिषेक सोहळा पार पडला सायंकाळी पाळणा पुजन व महाअभिषेक केला गेला व नंतर शेवटी संगीत वाद्य व लाईट शो आणि भव्य आतिषबाजी केली गेली. आणि टाळ मृदुंग यांच्या गजरात महाराजांचे पोवाडा गायले गेले हा नयन रम्य सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी खुप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली या साठी परिश्रम घेणारे मित्र परिवार आणि या मंडळाचे संयोजक तथा मार्गदर्शक श्री काकासाहेब देशमुख ( मा. उपनगराध्यक्ष) ,मंडळाचे अध्यक्ष चि. स्वरुप जगताप, कार्याध्यक्ष श्री यश राजपूत,उपाध्यक्ष चि निखिल गंगावणे, खजिनदार श्री शाम देशमुख, सहखजिनदार चि. रोहित आमले, सरचिटणीस चि. अक्षय देशमुख, सरचिटणीस चि. वेदांत देशमुख, चि.गैरव लकारे, सल्लागार श्री सुमित चव्हाण, गजानन आंधळे आणि मंडळाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले असून हा सोहळा पार पडला.

Previous articleमराठा आरक्षणासाठी महत्वाचा दिवस, आज विधानसभेचे विशेष अधिवेशन
Next articleछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here