Home भंडारा चिखलपहेला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न

चिखलपहेला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न

104

आशाताई बच्छाव

IMG_20240220_081606.jpg

चिखलपहेला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील पहेला येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपहेला येथे आज दिनांक 19 फरवरी 2024 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाकेश्वर येथील सरपंच लुहास गोंडाणे यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून प्राध्यापक जयदेव देशमुख उपस्थित होते .प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संदीप संयाम, उपसरपंच मनोज शहारे, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद भोयर ,रवींद्र केवट, रामरतन केवट, मार्कंड शहारे तलाठी ,पोलीस पाटील दिलीप शहारे, माजी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा चापले, उषा भोयर ,गुरुदेव देशमुख दामू चचाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समितीचे अध्यक्ष नितून शहारे ,साजन पेंदे यांनी सहकार्य केले.