Home नांदेड साश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.

साश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.

125
0

आशाताई बच्छाव

1001487621.jpg

साश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड :- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचा देशसेवेच्या कर्तव्यावर असताना श्रीनगरच्या परिसरात 6 मे रोजी अपघाती मृत्यू झाला होता. आज 9 मे रोजी देगलूर येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी व मोठ्या नागरिक उपस्थित होते.

सचिन यांच्या निधनाची माहिती भारतीय सैन्यदलामार्फत त्यांच्या कुटुंबियांना मिळताच तालुक्यातील तमलूरसह देगलूरवर शोककळा पसरली. शहीद सचिन यांचे पार्थिव आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी पहाटे 4 वाजता दाखल होताच परिवारातील सदस्यांसह उपस्थितीतांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.

सकाळी ठिक 8.30 वाजता फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून शहिद सचिन वनंजेच्या घरापासून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. शहरातील मुख्य मार्गाने नगरपालिका शेजारी असलेल्या मैदानात अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी “शहिद सचिन वनंजे, अमर रहे अमर रहे” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गटविकास शेखर देशमुख, मुख्याधिकारी निलम कांबळे आदींसह आजी व माजी सैनिक आणि मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली व यावेळी मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश वाचुन दाखवण्यात आला. देगलूर नगरपालिका शेजारी तयार केलेले अंत्यविधीस्थळी भारतीय सैन्यदलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शहीद सचिन वनंजेच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले.

सचिन वनंजे सन 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाला होते. त्यांची पहिली पोस्टिंग सियाचीन भागात झाली. त्यानंतर जालंधर पंजाब येथे त्यांनी सेवा केली. गेल्या दीड वर्षापासून ते श्रीनगरमध्ये कर्तव्यावर होते. दरम्यान दि.6 मे रोजी वाहन दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here