आशाताई बच्छाव
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उंद्री प.दे.ता. मुखेड येथील श्रीकांत राठोडचे मिळवले दहावी परीक्षेत मोठे यश.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड- विद्यावर्धिनी विद्यालय अहमदपूर शाळेतून सहावा क्रमांक तर अक्षता बाल संस्कार केंद्र अहमदपूर येथून द्वितीय क्रमांक विद्यार्थी श्रीकांत गुलाब राठोड ने दहावी बोर्ड परीक्षेत 96.60 %गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
कठोर मेहनत आणि जिद्द या मुळेच आपल्याला हे यश मिळाले आहे असे त्याने बोलताना सांगितले .या यशामध्ये माझे आईवडिल आणि गुरूजनांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
माझ्या शाळेतील शिक्षक आणि शिकवणी वर्गाचे शिक्षकांनी वर्षभर सातत्याने मला मार्गदर्शन केले त्यांच्यामुळेच मला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.






