Home बुलढाणा EXCLUSIVE! मलकापूर -चिखली मार्गाचे होणार चौपदरीकरण ! – चिखली रोड वरील -महागड्या...

EXCLUSIVE! मलकापूर -चिखली मार्गाचे होणार चौपदरीकरण ! – चिखली रोड वरील -महागड्या जमिनी रस्ते रुंदीकरणात जाण्याची भिती ! 15-20 हजार स्क्वेअर फुट भावाच्या जमिनी आता रस्त्याखाली जाणार?

29
0

आशाताई बच्छाव

1001482516.jpg

EXCLUSIVE! मलकापूर -चिखली मार्गाचे होणार चौपदरीकरण ! – चिखली रोड वरील -महागड्या जमिनी रस्ते रुंदीकरणात जाण्याची भिती ! 15-20 हजार स्क्वेअर फुट भावाच्या जमिनी आता रस्त्याखाली जाणार?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा शहरातील चिखली मार्गावरील दुर्तफा जमिनीचे भाव गग्नाला भिडले. अनेकांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवली मात्र आता या मार्गाचे लवकरच चौपदरीकरण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खरेदी करून ठेवलेल्या जमिनी ह्या रस्ते रुंदीकरणात जाणार असल्याची शक्यता आहे. परिणामी काहींनी सतर्कता ठेवून या मार्गावरील व्यवहार थांबविले असून, लवकरच मलकापूर ते चिखली नॅशनल हायवे मार्गाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे.
मलकापूर ते चिखली मार्गाचे चौपदरीकरण होणार असून याची वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असली तरी, सदर मलकापूर ते चिखली हा मार्ग सध्या बीओटी तत्त्वावर बुलढाणा अर्बन बँकेच्या अधिपत्याखाली आहे. मलकापूर रोडवरील एआरडी सिनेमा हॉल पासून तर चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर पर्यंत कमालीची रहदारी व वाहनांची वर्दळ असते. चिखली मार्गावर तर अनेकांनी 15 ते 20 हजार रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे जमिनी घेऊन ठेवल्या, बंगले बांधले. परंतु हा मार्ग नॅशनल हायवे म्हणून नवी ओळख निर्माण करेल. यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 1200 कोटी रुपयांची घोषणा देखील केली आहे. शिवाय नॅशनल हायवे साठी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार सुख चैन संचेती, आमदार श्वेता महाले यांचा विशेष आग्रह आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग बुलढाणा अर्बनच्या बीओटी तत्त्वातून काढावा लागणार आहे आणि बुलढाणा अर्बनला देय रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवे महामार्ग होऊ शकते. ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे शिबीर सुरू.आश्रमात१२0, विद्यार्थी२0, दिवस घेणार संत विचाराचे धडे ,
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here