आशाताई बच्छाव
कळी काळाची भीती नष्ट करणारे तत्त्वज्ञान म्हणजे शिव महापुराण असे ह भ प सुनील गाडेकर महाराज म्हटले
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे शिव महापुराण कथा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराज तत्त्वज्ञान आहे कळी काळापासून सुटका व्हावी धर्मार्थ काम मोक्ष यांची वृद्धी जीवनामध्ये व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने शिव महापुराण कथा ऐकावी असे हभप सुनील गाडेकर महाराज यांनी सांगितले भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे शिव पंचायतन महायज्ञ शिवपुरा महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन करण्यात आले आहे शिव महापुराण मध्ये भगवान शिव तत्व हे ब्रह्म विष्णू या सर्वांपेक्षा महान तत्व आहे याहीपेक्षा शिवजी ज्योतिर्मय रूपाने सर्वत्र विराजमान आहे आपल्या भारत वर्षामध्ये बारा ज्योतिर्लिंग असल्याने सुनील गाडेकर महाराज यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी असून अशा महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग असणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे यांनी सांगितले त्यामध्ये शिवजी वेगवेगळी शक्तिशाली आहे जीवनामध्ये कुठलातरी समस्या आली तर निश्चित शिव चिंतन केल्यानंतर शिवची आराधना शिव चिंतन केल्यानंतर शिव पूजनाने दूर होती तरी अनेक उदाहरणे शिव महापुराण मधून महाराजांनी दिले यावेळी आप्पा सुनील गाडेकर महाराज ह भ प समाधान लोखंडे महाराज ,ह भ प निवृत्ती महाराज ,ह भ प ज्ञानेश्वर महाराज उंबरकर महाराज व गावकरी भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.