आशाताई बच्छाव
अड्याळ येथे महाराष्ट्र व कामगार दिन सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करून गावातून काढली स्वच्छता रॅली
संजीव भांबोरे
भंडारा-आज दिनांक 1 मे 2025 ला महाराष्ट्र व कामगार दिन त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अड्याळ गावातून ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गावातून स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी अड्याळ येथील ग्रामपंचायत सरपंच शिवा मुंगाटे, ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे ,ग्रामपंचायत सदस्य बिपीन टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य पंकज ढोक, माजी सरपंच ताराबाई कुंभलकर, पवन वंजारी, ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे, मंडळ अधिकारी नथू शेंडे ,गुरुदेव सेवा मंडळाचे प्रदीप आंबेकर महाराज, अभिमान मोहनकर, कृष्णा मुंगाटे,नामदेव भुरे ,उत्तर बुनियादी शाळेतील मुला-मुलींनी व शाळेतील शिक्षकांनी यात सहभाग घेतला.