Home उतर महाराष्ट्र जिल्ह्यात आठवडाभरात ११२ अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे

जिल्ह्यात आठवडाभरात ११२ अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे

74

आशाताई बच्छाव

1001488557.jpg

जिल्ह्यात आठवडाभरात ११२ अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे- स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध धंदे विरोधात कंबर कसली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात ११२ ठिकाणी छापे टाकून विविध पोलीस ठाण्यात ११२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ८ लाख २८ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेले अवैध दारू, हातभट्टी, जुगार, मटका चालविणाऱ्यावर छापे टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर एमआयडीसी – १२, नगर तालुका -११, पारनेर – ५, श्रीगोंदा – ३, शेवगाव – ८, नेवासा -१२, पाथर्डी – ४, श्रीरामपूर शहर – ११, संगमनेर शहर १, अकोले -४, राजूर – २, शिर्डी -१५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Previous articleनिर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड
Next articleमंत्री नितेश राणे व इंद्रनील नाईक यांनी केले जगताप कुटुंबियांचे सांत्वन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.