आशाताई बच्छाव
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू
सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर( संजीव भांबोरे): प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेवाडी- अकलूज येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. सदर वाचनालयाचे उद्घाटन सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. देवन्या मोहिते-पाटील म्हणाल्या की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे. या वाचनालयमुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रमुख रामलिंग सावळजकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर, पत्रकार संजय लोहकरे, सुनील कांबळे, विशाल साठे, सचिन झेंडे, अनुराग खंडागळे, पृथ्वीराज कारंडे, प्रकाश भोसले, लालुभाई शेख, बल्लू देशमुख, विजय सुर्यवंशी, रघुनाथ देशमुख, अण्णासाहेब जगदाळे, दादा थीटे, अशोक कोळी, सुनिल कांबळे, विशाल साठे, पृथ्वीराज कारंडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत कडबाने तर आभार सोमनाथ खंडागळे यांनी मानले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीने उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य संघटक अनिल राठोड, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, मराठवाडा संघटक बा. पू. गायकर, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड. परेश जाधव, प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे कौतुक केले आहे.