Home बुलढाणा बुलडाणा मतदारसंघात प्रशांतभाऊ वाघोदे शेवटी ‘वंचितच’.

बुलडाणा मतदारसंघात प्रशांतभाऊ वाघोदे शेवटी ‘वंचितच’.

16
0

आशाताई बच्छाव

1000889587.jpg

बुलडाणा मतदारसंघात प्रशांतभाऊ वाघोदे शेवटी ‘वंचितच’.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा काल रात्री जाहिर झालेल्या वंचित बहुजन आघाडी च्या यादी मध्ये बुलडाणा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी सदानंद माळी यांना मिळाली म्हणुन सर्व आंबेडकरी समाजात नाराजी दिसुन येत आहे. वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे हे एकमेव उमेदवार पक्षासाठी योग्य असताना व समाज भावना त्यांच्या सोबत असताना सदानंद माळी यांना उमेदवारी जाहीर होणं हे कुठेतरी पक्षासाठी हानीकारक आहे.
जिल्ह्यामध्ये कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो गरीब असो वा श्रीमंत प्रशांत भाऊंनी कधीच भेदभाव न करता जातीभेद न करता गोरगरिबांची कामे पोलीस स्टेशन, दवाखाना, ग्रामपंचायत पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत ची कामे निस्वार्थपणे करत आहेत अशा उमेदवाराला उमेदवारी न मिळणे चिंतेचे कारण आहे
प्रशांत वाघोदे हे संघर्षशिल नेतृत्व आहे,त्यांच्या मुळे बुलडाण्यात वंचित पक्ष जिवंत आहे पण हजारो आंदोलनं,मोर्चे,वंचित घटकातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम प्रशांत वाघोदे यांनी केले आहे म्हणुन या वेळी तरी त्यांना पक्ष उमेदवारी देऊन त्यांचा सत्कार करेल अशी आशा होती पण समाजाच्या झोळीत निराशाच पडली.सदानंद माळी हे अगोदर पक्ष सोडुन गेले,उबाठा मध्ये नेते आहे त्यांना उमेदवारी का मिळाली असा संताप या वेळी समाजात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here