Home बुलढाणा मेरा खु येथे महावितरण कर्मचारी यांच्या नियोजन शुन्य कारभार

मेरा खु येथे महावितरण कर्मचारी यांच्या नियोजन शुन्य कारभार

27
0

आशाताई बच्छाव

1000841909.jpg

मेरा खु येथे महावितरण कर्मचारी यांच्या नियोजन शुन्य कारभार
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथे लाईनमन यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे मेरा खुर्द येथील एका डीपीवर लाईनचा एकदम जास्त वीज पुरवठा झाल्यामुळे गोरगरीब जनतेच्या घरातील लाईट टीव्ही जळाले आहेत त्यामुळे मेरा खुर्द येथे लाईनच्या कर्मचाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारा समोर आला आहे मेरा खुर्द येथे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीला जबाबदार कोण असे सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा करत आहे मेरा खुर्द येथे आता नवीनच थोड्या दिवसापूर्वी केबल वायरिंग झाली आहे ती व्यवस्थित चालू असतानाच एकदम दोन फेजमध्ये जास्त लाईट आल्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या घरातील उपकरणे जळण्यावर झाला आहे आज शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढत आहे त्यातच आता हे एक आर्थिक संकट शेतकऱ्यावर कर्मचाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आले आहे आज शेतकरी हावालदिल झाला आहे मेरा खुर्द येथे महावितरण चे पावर हाऊस आहे त्याच गावात जर ही परिस्थिती आहे तर बाकी खेड्यापाड्याने काय परिस्थिती असेल याची सुद्धा चर्चा मेरा खुर्द येथे सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here