आशाताई बच्छाव
ड्रायव्हिंग टेस्ट साठी आरटीओत कशाला? गाडी शिकलात त्याच ठिकाणी टेस्ट! जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर लवकरच चालकांच्या सेवेत.
__________
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आरटीओ कार्यालयामध्ये विविध कामासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर परफेक्ट ट्रेनिंग साठी “डीटीसी”केंद्राला मंजुरी दिली आहे. यामुळे वाहन चालक, नागरिकांना वाहनाच्या कामासाठी आरटीओ जाण्याची गरज असणार नाही. सरकारने अमरावती येथेमार्डी मार्ग लगत”परफेक्ट ट्रेनिंग”साठी”डी टी सी”केंद्र मंजूर केले आहे. वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अमरावती येथे मार्डी मार्ग लगत ट्रेनिंग सेंटरला परवानगी दिली आहे. लवकरच हे सेंटर वाहन चालकाच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या सोयीमुळे वाहनावर”टेस्ट”देण्यासाठी आरटीओ जाण्याची गरज पडणार नाही. सरकारने वाहतूक नियमावली मध्ये १ जून पासून नवीन नियम लागू केले आहेत. अत्याधुनिक ट्रक व यंत्राच्या साह्याने चालकाच्या वेगवेगळ्या चाचण्या घेऊन त्यांना वाहन चालवण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक केले आहे. आता अमरावती जिल्ह्यातील मार्डी मार्गावर देण्यात येणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट. मार्डी मार्गा लागत”परफेक्ट ट्रेनिंग”केंद्र सरकार साकारण्यात आले आहे. चालकांना येथे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे. येथे सेमी शेमुलेटर वाहन चालवण्याचे प्रशिक्षणापासून ते वाहनावर नियंत्रण मिळविण्यापर्यंत आणि रिएक्शन टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. सदर ट्रेनिंग करिता किती शुल्क लागणार डीटीसी केंद्रात खालील प्रमाणे, लर्निंग लायसन: १५० , लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क: ५०, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क: २००, लायसन्स नूतनीकरण: २००, दुसऱ्या वाहनाची अतिरिक्त लायसन्स: ५०० इत्यादी चार्जेस ठरविण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी आता नवीन नियम लागू होणार. वाहतूक नियमाचे अचूक माहिती देणे, धोक्याचे इशारे व दिशा निर्देश देणाऱ्या वाहतूक चिन्हाचा बोध, चढावा वर किंवा उतारावर वाहने तालुक्यांना खबरदारीची माहिती देणे, वाहनाची तांत्रिक माहिती देणे तसेच वाहन चालकांना तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी”डीटीसी केंद्रातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आय डी टी आर) आणि”डी टी सी “ला परवानगी दिली आहे. अमरावती येथे सिकना अभियांत्रिक काकडे जबाबदारी देण्यात आली असून, मराठी मार्ग लागत’परफेक्ट ट्रेनिंग’केंद्र तयार झाले आहे. हे केंद्र लवकरच सुरू होणार असून वरिष्ठांचे आदेशातील प्रतीक्षा आहे. असे आरटीओ गीते प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे.