Home भंडारा बेटाळा येथील संस्कार शिबिरात उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव ‌यांच्या हस्ते पुस्तकाचे...

बेटाळा येथील संस्कार शिबिरात उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव ‌यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन

73
0

आशाताई बच्छाव

1000421951.jpg

बेटाळा येथील संस्कार शिबिरात उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव ‌यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी):- ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात बालसंस्कार ग्रिष्मकालीन निःशुल्क संस्कार शिबीरात लेखक अमीर शेख यांच्या पुस्तकांचे विमोचन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे होते. व तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बेटाळा येथील सरपंचा रेश्माताई ईश्वरकर, लेखक अमीर शेख, माजी मुख्याध्यापक विनायक मोथारकर, प्रमुख मार्गदर्शक सावली नर्सिंग होमचे डॉ. रत्नाकर बांडेबूचे, सत्कारमूर्ती अनिल भालेराव, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, रामप्रसाद मस्के, केंद्र प्रमुख बंडूभाऊ खोब्रागडे, ग्रामीण संस्कार शिबीर जिल्हा प्रमुख तथा पत्रकार विलास केजरकर, सहाय्यक शिक्षक लिलाधर वैद्य, मुख्याध्यापक जे. एस. आंबिलढुके, माजी मुख्याध्यापक बी. आर. रहाटे, उपसरपंच प्रशांत राऊत, एम. एम. कानेकर, योग शिक्षक निकेश सार्वे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अमीर शेख यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊन विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. याबरोबर छोटे मोठे लिखाण करण्याचा मानस होता. अशातच लेखक अमीर शेख यांच्या “-१+यू: द इक्वेशन ऑफ हारमनी” या पुस्तकाचे काम पूर्ण झाले. आणि संस्कार शिबिरात या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विद्यार्थी मित्र, पालकवर्ग, गावातील व परिसरातील तरुण मंडळी, शिक्षक वृंद, ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी व बालसंस्कार शिबिरार्थ्यी ४२ अंश तापमान असुन सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र राऊत व प्रास्ताविक ग्रामीण विकास संघटनेचे संचालक कार्तिक डोरले यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीकांत नंदूरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महेंद्र राऊत, कृष्णा कानेटकर, अविनाश नंदूरकर, प्रशांत कुंभरे, अविनाश राऊत, सचिन पडोळे, भूषण बोरकर, शुभम लिल्हारे, महेंद्र राऊत, क्रिष्णा कमाने, वासु कुंभलकर, शाहिणा शेख, शितल चौधरी, सुनिल समरित, चैतन्य ठोंबरे, प्रशांत कुंभरे, सचिन पडोळे, विधी बान्ते, श्रृती ईश्वरकर, लावण्या समरित, समिक्षा कुकडे, सर्वरी डोरले, शिवानी भोयर, आरूषी ईश्वरकर, रूद्र डोरले, तेजश्विनी ईश्वरकर, आदेश बान्ते, माही राऊत, सर्वरी ईश्वरकर, वंंशिका बोरकर, आकांक्षा हरकंडे, आरजू नेरकर, ऋतुजा बागडे, वंंशिका ईश्वरकर, चैताली नेरकर, मिनल समरित, श्रेया राऊत, धनश्री बुराडे, सानिया कुकडे, स्नेहा वनवे, सायना रामटेके, श्रीनिथी चरडे, शितल चौधरी, समिक्षा शहारे, अनुजा ईश्वरकर, नेहा जिभकाटे तसेच पालकवर्ग, ग्रामीण विकास संघटनेचे पदाधिकारी व बालसंस्कार शिबिरार्थ्यांनी अभिनंदन करून सहकार्य केले.

Previous articleअंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 विष्णुदास लोणारे यांना प्राप्त
Next articleअमरावती महानगरपालिका मालमत्ता करात सूट३० जून पर्यंत. वसुली पोहोचली ४५ कोटीवर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here