आशाताई बच्छाव
वानखेड ते वरवट बकाल रोडच्या कामावर बांधकाम विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.?
युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील – ग्रामा 97 वानखेड ते वरवट बकाल रस्त्याची सुधारणा करणे चालू असलेल्या कामावर वान नदीपात्रातून अवैधरित्या रेती मिक्स रुडी वापरण्यात आली त्यामुळे ररत्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे मात्र सदर काम सुरू असताना नदीपात्रामधून अवैद्य उत्खनन करून रेतीमिक्स रूढी वापरल्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याला टक्केवारीचे ग्रहण लागलेले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याच्या कामाकडे वानखेड गावातील नेत्यांचे देखील दुर्लक्ष झाले असून जनतेच्या पैशातून अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे रस्ते होत असतांना गाव पुढारी जर गप्प बसत असतील तर यासारखी वाईट शोकांतिका कोणतीच नाही शासन कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामावर खर्च करीत असतांना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही टिकतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे सदरच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे निकृष्ट दर्जाचे काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी हे शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत या रस्त्याच्या कामाची चौकशी होणे तर आवश्यक आहेच त्याचबरोबर या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणे त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असल्याचे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे.






