Home नाशिक पिंगळवाडे परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत

पिंगळवाडे परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0032.jpg

पिंगळवाडे परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
साधारण चार दिवसापासून सुरू असलेली पावसाची जबरदस्त हजेरी यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या पावसामुळे पेरणी झालेली पीके कुज होताना दिसत आहे. त्यात मका, बाजरी, सोयाबीन, तूर,इत्यादी पिके पूर्ण वाया जातील की काय अशी शंका शेतकरी वर्गाला दिसत आहे. या बरोबरच ज्या डाळिंब बागा काही दिवसातच काढणीवर येणार होत्या अशा बागा पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. डोंगर दऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे डोंगरकाठी असलेल्या शेत जमिनीत पाणी घुसल्याने जमिनीची भुस्खकलन होत आहे. तसे या पाण्यामुळे बहुतेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत.पांधण रस्त्यांची तर अवस्था अगदी बिकट आहे. शेतमजूर, शेतकरी वर्ग चार दिवसापासून घरातच बसून असल्यामुळे शेतातील कामे खोळंबंली आहेत. या पावसामुळे पाळीव प्राण्यांचा चार्याअभावी दुरावस्था झाली आहे. भाजीपाला पिके आता मात्र पूर्णपणे वाया गेली आहे. त्यात कोबी, वाल, टोमॅटो ई. पावसामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा त्रास होताना दिसत आहे. जवळ जवळ 70 टक्के विद्यार्थी घरीच आहेत. बहुतांशी विद्यार्थी शेतात राहत असल्यामुळे पांदण रस्ते वाहून गेल्याने विद्यार्थी वर्गाने घरीच राहणे योग्य समजले आहे. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे

Previous articleदसाना लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो
Next articleसप्तशृंगी गडावर ढगफुटी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here