Home नाशिक नाशिक पदवीधर निवडणूक सुरेश पवार यांना छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा

नाशिक पदवीधर निवडणूक सुरेश पवार यांना छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0012.jpg

नाशिक पदवीधर निवडणूक सुरेश पवार यांना छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

नाशिक पदवीधर मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक रोमांचक मोडवर आली असतांना शेतकऱ्यांचे कैवारी सुरेश भीमराव पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने सुरेश पवार यांनी या निवडणुकीत मोठी आघाडी घेतल्याने विरोधकांना धडकी भरली आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची राज्यभर चर्चा सुरू असतांना सुरेश पवार यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन दोन तास बंद दाराआड चर्चा करून विरोधकांची झोप उडवून दिलेली असतानाच आता थेट छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या स्वराज्य संघटनेचा सुरेश पवार यांना जाहीर पाठिंबा दिल्याने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या प्रचारात सुरेश पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सुरेश नाना पवार यांचा सत्कार करण्यात आला.
स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा प्रसंगी प्रवक्ता डॉ. धनंजय जाधव, संपर्क प्रमुख करणभाऊ गायकर, राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे, अंकुश कदम, सोमनाथ जाधव, प्रसाद दळवी, भाऊसाहेब अहिरे, योगेश सोनवणे, किशोर खैरनार, देवाबापु वाघ, दीपक निकम, राकेश देवरे आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here