Home उतर महाराष्ट्र चुरशीच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेची एन्ट्री, छत्रपती संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ संघटनेचा कुणाला पाठिंबा?

चुरशीच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेची एन्ट्री, छत्रपती संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ संघटनेचा कुणाला पाठिंबा?

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0016.jpg

चुरशीच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेची एन्ट्री, छत्रपती संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ संघटनेचा कुणाला पाठिंबा?

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

धुळे येथील शुभांगी पाटील आणि संगमणेर येथील सत्यजित तांबे यांच्यात खरी लढत होईल अशी स्थिती असतांना सुरेश पवार यांनी स्वराज्य संघटनेचा पाठिंबा घेऊन जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.
सुरुवातीपासून चुरस निर्माण झालेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. त्यातच आता स्वराज्य संघटनेचा पाठिंबा अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी मिळवला आहे. त्यामुळे दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कसमादे परिसरात दांडगा जनसंपर्क असलेले सुरेश पवार स्वराज्य संघटणेचा झेंडा घेऊन कॉंग्रेसचे निलंबित अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि अपक्ष उमेदवारी आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवलेल्या शुभांगी पाटील यांना टक्कर देणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून चुरशीची ठरत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणखी रंगतदार होत आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस पाठिंबा मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या सुरेश पाटलांना निराशा पदरी पडल्यानंतर त्यांनी स्वराज्याचा झेंडा हाती घेतला आहे. कॉंग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी सुरेश पवार स्वतः नाना पटोले यांच्या भेटीला गेले होते. तर दुसरींकडे शुभांगी पाटील यांना कॉंग्रेससह महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने सुरेश पवार आता शिक्षक संघटना आणि स्वराज्य संघटनेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत.
राज्यातील पाचही विभागात अत्यंत चुरशीची आणि चर्चेत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आत्तापर्यंत दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिकच्या बागलाण येथील अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी नुकताच स्वराज्य संघटनेत प्रवेश केला असून अधिकृत पाठिंबा मिळवला आहे. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थित त्यांनी स्वराज्य संघटनेत प्रवेश केला आहे.
धुळे येथील शुभांगी पाटील आणि संगमणेर येथील सत्यजित तांबे यांच्यात खरी लढत होईल अशी स्थिती असतांना सुरेश पवार यांनी स्वराज्य संघटनेचा पाठिंबा घेऊन जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.
नाशिक विभागात स्वराज्य संघटनेची मोठी ताकद आहे. गावागावात स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आहे, याचा फायदा सुरेश पवार यांना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत आणखी चुरस बघायला मिळणार आहे.

Previous articleनाशिक पदवीधर निवडणूक सुरेश पवार यांना छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा
Next articleसटाणा येथील फौजदार बंगला दारूबंदी विभागाच्या अधिका-यांकडून सील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here