Home नांदेड मुखेड तालुक्यातील प्रथम (ISO) आयएसओ मानांकन आंबुलगा येथील जिल्हा परिषद शाळेस प्राप्त.

मुखेड तालुक्यातील प्रथम (ISO) आयएसओ मानांकन आंबुलगा येथील जिल्हा परिषद शाळेस प्राप्त.

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0009.jpg

मुखेड तालुक्यातील प्रथम (ISO) आयएसओ मानांकन आंबुलगा येथील जिल्हा परिषद शाळेस प्राप्त.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड तालुक्यातील प्रथम (ISO) आयएसओ मानांकन मिळविणारी अंबुलगा येथील जिल्हा परिषद शाळा बनली आहे. आंबुलगा ह्या गावचे नाव शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले गाव म्हनुन ओळखले जाते. त्यामुळे अंबुलगा येथील जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही शाळेला स्थान मिळाले आहे.
दि.२० शुक्रवार रोजी जि.प.कें.प्रा.शाळा अंबुलगा (बु) येथे मा.डॉ. संजय कदम साहेब व मा.वडजे साहेब शिक्षणविस्तारअधिकारी बीट – जाहूर यांच्या अध्यक्षतेखाली हनुमंत झाडे अध्यक्ष शा. व्य. स. अंबुलगा ,अंबूलगा गावचे सरपंच प्रतिनिधी बालाजी रॅपनवाड व उपसरपंच शरद पाटील , शिवाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. दासरवार साहेब यांनी केले तर अध्यक्षीय भाषण श्री. वडजे साहेब यांनी केले यात त्यांनी आयएसओ (ISO) मानांकन मिळवणे व त्यासाठी शाळा स्तरावर ज्या सुधारणा करायचे असतात त्या आपण कशा करू शकतो तसेच आयएसओ प्रमाणपत्र कसे मिळवू शकतो याचे सखोल असे मार्गदर्शन केले.
यानंतर मा.कदम साहेब व वडजे साहेब तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. नल्लामडगे सर व केंद्रप्रमुख श्री.दासरवार सर यांना (ISO) प्रमाणपत्र प्रदान करुन हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक,ग्रा.प.सदस्य तसेच केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर जवळदापके सर यांनी केले तर श्री स्वामी सर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here