Home गडचिरोली महिलांनी आपसामधील मतभेद दूर करून आनंदाने जीवन जगावे माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे...

महिलांनी आपसामधील मतभेद दूर करून आनंदाने जीवन जगावे माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन उखाणे स्पर्धेत रामनगरच्या मनीषा सुनील सिडाम प्रथम मकर संक्रांतीनिमित्य गडचिरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0034.jpg

महिलांनी आपसामधील मतभेद दूर करून आनंदाने जीवन जगावे

माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
उखाणे स्पर्धेत रामनगरच्या मनीषा सुनील सिडाम प्रथम

मकर संक्रांतीनिमित्य गडचिरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- 
आपण समाजामध्ये जीवन जगत असताना अनेक महिलांमध्ये मतभेद व हेवेदावे पहायला मिळतात यातून काहीही साध्य होत नसताना आपण विनाकारणच मतभेद करून संकुचित जीवन जगत असतो त्यामुळे महिलांनी आपसातील मतभेद व हेवेदावे दूर करून चांगल्या रीतीने आनंदाने जीवन व्यतीत करावे व अशा मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने असे उत्सव साजरे करावे असे आवाहन गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले मकर संक्रांतीच्या निमित्याने गडचिरोली येथे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या अर्धांगिनी सौ बीनाराणी होळी यांच्या तर्फे मकर संक्रांतीच्या निमित्याने गडचिरोली येथील गानली समाज सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन काल दि 20 जानेवारी रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आम. डॉ देवरावजी होळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बिनाराणी देवरावजी होळी, माजी जिप अध्यक्ष योगीताताई भांडेकर, माजी जिप समाज कल्याण सभापती रंजिता कोडाप,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, नीताताई उंदिरवाडे, कोमल बारसागडे , अर्चना निंबोड, ज्योती बागडे, संगीता बारापात्रे, वछलाबाई मुनघाटे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री केशव निंबोड , विलास नैताम, देवाजी लाटकर, उपस्थित होते.

यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खास महिलांसाठी एक मिनिटाची उखाणे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये रामनगर येथील रहिवासी मनीषा सुनील सिडाम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला त्यांनी एका मिनिटांमध्ये सात उखाणे घेऊन स्पर्धेत बाजी मारली तर वैरागडे यांनी सहा उखाणे घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी बीनाराणी देवराव होळी यांच्याकडून प्रथम पाचशे रुपये व द्वितीय 300 रुपयांचा पुरस्कार देऊन मनीषा सिडाम व वैरागडे यांना गौरविण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमाला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleगोंडवाना विद्यापीठाचा तो ठराव रद्द करावा वसंंतराव कुलसंगे २६ जानेवारीपासुन आमरण उपोषणला बसणार
Next articleमुखेड तालुक्यातील प्रथम (ISO) आयएसओ मानांकन आंबुलगा येथील जिल्हा परिषद शाळेस प्राप्त.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here