• Home
  • भरधाव ट्रकची दुचाकीला धडक विवाहित महिला जागीच ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक विवाहित महिला जागीच ठार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201208-WA0125.jpg

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक विवाहित महिला जागीच ठार

पेठ वडगांव : पुणे बेंगलोर हायवे वरती टोप कासारवडी फाट्यानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने विवाहित महिला जागीच ठार.
कासारवाडी फाट्याजवळ पुण्याहून कागलच्या फाइव स्टार एमआयडीसी कडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.०९सी. यु.९६१७) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने,
दुचाकिवरील (एम.एच.०९ एफ.ए.३९३७)विवाहित महीला सौ.सुमित्रा मोहन पुदाले अंदाजे (वय ३० वर्ष ) रा.कोरेगांव ता.वाळवा जि.सांगली भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. सुमित्रा यांची मुलगी तनिष्का पुदाले वय (५ वर्ष) व वडील रामचंद्र पोवार वय (६० वर्ष )
रा.वरणगे पाडळी ता.करविर जि.कोल्हापूर जखमी झाले आहेत.
रामचंद्र पोवार हे मुलगी सुमित्राला नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या कार्याला आणि आपल्या मुलग्याच्या
वाढदिवसाला सासरहून माहेरी वरणगे पाडळी येथे घेऊन येत होते .
या अपघातामुळे माहेरीवरणगे पाडळी गावावर शोककळा पसरली .
भावाच्या वाढदिवसाला बहीनीचे निधन झालेने पोवार कुठुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिरोली पोलीसांनी अपघाताची माहिती मिळतात अपघात ठिकाणी तातडीने धाव घेतली व जखमींना उपचाराकरिता दवाखान्यात तात्काळ हलविण्यात आले व ट्रक चालक शेरनबाब गणीहुसेन फकीर याला ताब्यात घेतले आहे, सदर अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment