• Home
  • लायनेस क्लबच्या सदस्यांनी भेटवस्तू देऊन लग्न वाढदिवस केला साजरा

लायनेस क्लबच्या सदस्यांनी भेटवस्तू देऊन लग्न वाढदिवस केला साजरा

लायनेस क्लबच्या सदस्यांनी भेटवस्तू देऊन लग्न वाढदिवस केला साजरा (पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्युज ता. प्रतिनिधी सुरगाणा )
आमास सेवा ग्रुप मुंबई अंतर्गत लायनेस क्लब ऑफ जुहू रोड मुंबई वांगणपाडा (ह)ता. सुरगाणा येथे स्वेटर, फराळ वाटप करण्यात आले. स्व. जोत्स्ना व विनायककांत गांधी यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त भोजन देण्यात आले. हस्ते केंद्रातील रोंघाणे, वांगणपाडा, बिजूरपाडा, जांभूळपाडा (दा)कळमने, कचूर पाडा, भेगु (सा)या ७जिल्हा परिषद शाळेतील एकूण १६२विद्यार्थ्यांना स्वेटर, फराळ व भेटवस्तू मान्यवरानी वाटप केले. आमास सेवा ग्रुप चे अध्यक्ष विजय भगत, सदस्य चंद्रकांत देढिया, लायनेस क्लब ऑफ जुहू रोड च्या अध्यक्ष छायाबेन पारेख, सचिव पुष्पाबेन अग्रवाल, हेमाबेन शहा, हरिश्चन्द्र (बंटी ) भोये सर, कोकणे सर यांच्यातर्फे या साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सौ. उर्मिला गावित सरपंच कळमने, नामदेव महाले पोलीस पाटील वांगणपाडा, दिलीप गायकवाड पोलीस पाटील रोंघाणे, केंद्रप्रमुख शारदा सरोदे, सुरेश भोये सर बिजूरपाडा व परिसरातील ग्रामस्थ हस्ते केंद्रातील शिक्षक मोठया प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांना भेट वस्तू देण्यात आल्या. तसेच पळसन येथील सेवानिवृत्त मिलिटरीमन मा. गोपाळ गायकवाड व त्यांची पत्नी इंदूमती गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. वांगणपाडा येथील अंगणवाडी सेविका यांना साडी पातळ भेट देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय भोये सर व त्यांच्या शिक्षकमित्रानी प्रयत्न केले.

anews Banner

Leave A Comment