• Home
  • 🛑 ऐश्वर्या राय कोरोना पॉझिटिव्ह…! नानावटी रुग्णालयात…तापाची लक्षण 🛑

🛑 ऐश्वर्या राय कोरोना पॉझिटिव्ह…! नानावटी रुग्णालयात…तापाची लक्षण 🛑

🛑 ऐश्वर्या राय कोरोना पॉझिटिव्ह…! नानावटी रुग्णालयात…तापाची लक्षण 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ अभिनेतेअमिताभ बच्चन (amitabh bachchan), अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ऐश्वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तिला हलका ताप आला आहेत. त्यानंतर ऐश्वर्यासह आराध्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर आधीपासूनच नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

11 जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली.

हे “तुमचे खूप आभार मानायचे आहेत पण…”, चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेले अमिताभ यांनी व्यक्त केली खंत

12 जुलैला ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

दरम्यान बच्चन कुटुंबाला लवकरात लवकर बरं वाटावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांनी या सर्व चाहत्यांचे आभार मानलेत ⭕

anews Banner

Leave A Comment