• Home
  • 🛑 बालभारतीनं राष्ट्रपुरूषांच्या बदनामीची सुपारी घेतलीय का…? संभाजी ब्रिगेडचा सवाल 🛑

🛑 बालभारतीनं राष्ट्रपुरूषांच्या बदनामीची सुपारी घेतलीय का…? संभाजी ब्रिगेडचा सवाल 🛑

🛑 बालभारतीनं राष्ट्रपुरूषांच्या बदनामीची सुपारी घेतलीय का…? संभाजी ब्रिगेडचा सवाल 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये ‘भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले…’ असे लिहिले आहे. जणूकाही राष्ट्रपुरूषांची दरवर्षी बदनामी करायची सुपारी बालभारतीने घेतली आहे, असेच या चुकीवरून दिसते.

शिक्षणमंत्र्यांनी बालभारतीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी बलिदान दिले.

परंतु राष्ट्रपुरुष व्यक्तींची किंवा महापुरुषांची सतत बालभारती जाणीवपूर्वक बदनामी करते. हा खोडसाळपणा चालणार नाही. शिक्षणमंत्र्यांनी ‘बालभारतीची अभ्यास समिती’ तात्काळ बरखास्त करावी.

तसेच, कुरबान हुसेन यांच्यासह सोलापूरचे सुपुत्र त्या काळात हुतात्मा झाले. शहीद जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा या सर्व शहिदांचा पाठ्यपुस्तकांमध्ये यथोचित सन्मान झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment