Home Breaking News 26 सप्टेंबर पासून या देशात होणार आयपीएलला सुरुवात?

26 सप्टेंबर पासून या देशात होणार आयपीएलला सुरुवात?

511
0

26 सप्टेंबर पासून या देशात होणार आयपीएलला सुरुवात?

प्रतिनिधी =किरण अहिरराव

मुंबई । जगभरात कोरोना विषाणूमुळे क्रिकेट बऱ्याच दिवसांपासून बंद होते. बीसीसीआयनेही 29 मार्चपासून सुरू होणारी टी 20 लीग आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केले होते. तथापि, भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, आयपीएल 2020 दुबईमध्ये होऊ शकते आणि तसेच तारखेही निश्चित झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महागडी फ्रेंचायझी लीग आयपीएल 2020 चे आयोजन 26 सप्टेंबरपासून दुबईमध्ये केले जाऊ शकते. तर अंतिम सामना 8 नोव्हेंबर रोजी होऊ शकतो.

अलीकडेच कोरोना विषाणूमुळे आशिया चषक 2020 पुढील वर्षीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. याचे यजमानपद पाकिस्तानकडून श्रीलंकेला देण्यात आले होते. आशिया चषक तहकूब झाल्यानंतर टी -20 विश्वचषक तहकूब होण्याच्या अधिकृत घोषणेची भारत वाट पाहत आहे, त्यानंतर बीसीसीआय आयपीएलची अधिकृत घोषणा करू शकते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. त्याचबरोबर आयपीएलमध्ये भाग घेणारे सर्व भारतीय क्रिकेटपटूंसाठी युएईमध्ये 5 आठवड्यांच्या प्रशिक्षण आयोजीत करण्यात येईल. प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर आयपीएलच्या फ्रँचायझींना त्यांची स्वतःची प्रशिक्षण शिबिरे घेण्याची संधी दिली जाईल.

स्पोर्ट्सकिडामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयकडे युएई आयपीएल आयोजित करण्याचा पर्याय आहे, सध्या ते आयोजित करण्यास मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचा पहिला टप्पा अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथे झाला होता. आयपीएलचे ठिकाण निवडण्याचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे वास्तविक दुबई संपूर्ण जगाशी जोडलेली आहे. जगभरातून येथून उड्डाणे आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडूंना युएई, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज येथून आणणे सोपे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here