Home जालना कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षकाचे आव्हान.

कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षकाचे आव्हान.

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_071219.jpg

कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षकाचे आव्हान.

ईद व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर माहिती अशी की,
लोकसभेची आचारसंहिता, ईद व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील जाफराबाद शहरात विविध मार्गावरून पोलिसांनी पथसंंचलन केले दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी केले आहे.
जाफराबाद शहरातील राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, आदी मुख्य मार्गावरून पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव दल, गृहरक्षक दल होमगार्ड यांनी पथ संचलन केले.येणारी लोकसभेची निवडणूक, ईद व होळी धुलीवंदनासह इतर सण उत्सवाच्या काळात तालुक्यात तसेच जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तथा कुठलेही संशयास्पद बाबी आढळून आल्यास त्वरित पोलीस प्रशासनाला कळवावे पोलीस प्रशासन व शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास शहरातील पोलीस कर्मचारी सतर्क असून कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊन कायदा भंग करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी दिला आहे. यावेळी उपनिरीक्षक सखाहरी तायडे, सपोनी वैशाली पवार आदी सहभागी झाले होते.
“यांचा होता पथसंचलनात सहभाग’
जाफराबाद पोलीस ठाण्याचे चार पोलीस अधिकारी २० कर्मचारी सी आर पी एफ च्या 40 जवानांची तुकडी पोलिसांची तुकडी 25 होमगार्ड तीन पोलीस व्हॅन दंगा नियंत्रण पत्रकार पथकांचा समावेश होता यावेळी पोलीस ग्राउंड वर परळी घेण्यात आली पोलिसांनी विविध कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.

Previous articleनांदेड लोकसभा निवडणूक 2024- काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मुखेड.
Next articleमाहोरा येथे पाण्याची समस्या दूर होणार ? “अखेर टँकर झाले सुरू’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here