Home जालना सतीश घाटगेंनी दूर केली पारडगावातील मुक्या जीवांच्या पाण्याची अडचण  

सतीश घाटगेंनी दूर केली पारडगावातील मुक्या जीवांच्या पाण्याची अडचण  

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240318_185602.jpg

सतीश घाटगेंनी दूर केली पारडगावातील मुक्या जीवांच्या पाण्याची अडचण
—————
आठवडी बाजारातील  जनावरांसाठी सुरु केले मोफत टँकर

घनसावंगी/जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ:- तालुक्यातील पारडगाव येथे रविवारी जनावरांच्या बाजारात येणाऱ्या शेकडो जनावरांसाठी भाजपा नेते सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून पाण्याचे टँकर सुरु करून  व्यापारी- पशुपालकाना  मोठा दिलासा दिला. या मदतीबद्दल गावकऱ्यांनी  तसेच व्यापारी- पशुपालकानी सतीश घाटगे यांचे आभार मानले.

पारडगाव येथे दर रविवारी मोठा जनावरांचा  बाजार भरतो.जालना जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील व्यापारी पशुपालक या बाजारात जनावरांची खरेदी -विक्री करण्यासाठी येतात.या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले.ही  जनावरांची पाण्याची अडचण सतीश घाटगे यांनी सोडवली असून,जनावरांसाठी पाण्याचे  या ठिकाणी टँकर सुरु केले आहे. आठवडी बाजारा बरोबरच पारडगावासाठीही समृद्धी कारखाना  टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करत आहे. रविवारी आठवडी बाजारात जनावरांसाठी आलेल्या  पाण्याचे टँकरचे गावकऱ्यांनी स्वागत केले. यावेळी    भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष गजानन ढेरे,भास्कर ढेरे,जगन ढेरे,सोपान ढेरे,अर्जून ढेरे, भारत स्वामी, कृष्णा ढेरे, बाळु ढेरे, सोमनाथ चोरमारे, परमेश्वर ढेरे,बबन आढाव, लालामामुसय्यद, पत्रकार नजिर कुरैशी, साबेर कुरेशी,अब्दुल रहीम, रियाज मुस्तफा कुरेशी,नितिन नाटकर,शिवाजी माकोडे, जनार्धन माने,मोईन कुरेशी, हारुण कुरेशी, मुस्ताक पटेल, इरफान पटेल यांच्या सह शेतकऱ्याची उपस्थिती होती.

Previous articleउक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची  २१ हजाराची मदत
Next articleहिरामण पवार यांचं निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here