Home जालना चारा छावणी उभारण्याची जिल्ह्यातील गौ शाळा चालकांची मागणी

चारा छावणी उभारण्याची जिल्ह्यातील गौ शाळा चालकांची मागणी

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_075036.jpg

चारा छावणी उभारण्याची जिल्ह्यातील गौ शाळा चालकांची मागणी
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: यंदा भयंकर दुष्काळाची छाया जिल्ह्यावर पसरली असून त्या दृष्टीकोणातून जिल्ह्यात चारा छावणीची उभारणी करावी, अशी मागणी गौ शाळा चालकांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात प्रज्वल पशुपालन मंडळ व कृषि विकास मंडळ संस्थेसह जिल्हाभरातील श्रीकृष्ण गौशाळा पारडगांव, श्रीसंत सेवा महाराज प्रतिष्ठाण बाजी उम्रद, केशवभाऊ कुंज अच्युतभाई देशपांडे गौशाळा भाटेपूरी, शबरीमाता गौशाळा हिवरा रोषणगांव यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व संबंधीत यंत्रणेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षीचा दुष्काळ लक्षात घेता जनावरांच्या चार्यांचा प्रश्न निर्माण होऊन जनवरांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कृषी विभागडून संपूर्ण जालना जिल्ह्यातील गावात पाणी टंचाई आणि चारा  टंचाईबाबतचा सर्वे करुन संपूर्ण अहवाल सादर केलेला आहे. तो अहवाल जिल्हाधिकार्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्यावा आणि यावर्षी दुष्काळी परिस्थित असल्याने चारा छावणी सुरु केल्यास जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच शेतकर्‍यांंवर आलेले संकट दूर होईल.
यावर्षी पाहिजे तसा पाऊस न पडल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये चार्‍याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. वाढलेल्या किमतीत पशुखाद्य खरेदी करणे शेतकर्‍यांना न परवडणारे झाले आहे. अशातच पावस नसल्यामुळे चार्‍याचे संकट निर्माण झाले आहे. पुरेसा पाऊस पडलेला नाही. गावा- गावांत जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.  फळबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here