Home विदर्भ भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले

भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले

87
0

राजेंद्र पाटील राऊत

भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले               ( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

भंडारा दि. १० : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात लागलेल्या अचानक आगीत 17 नवजात शिशूपैकी 7 शिशूंना वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंनी तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. परंतु या दुर्घटनेत 10 शिशू मृत पावले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात (एसएनसीयु) येथे रात्रो उशिरा आग लागली. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलीस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरु नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात 17 नवजात शिशू दाखल झाले. त्यापैकी 10 शिशू मृत झाले असून त्यांच्या मातांची नावे याप्रमाणे, 1 – आईचे नाव – हिरकन्या हिरालाल भानारकर (मृतबालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली), 2 – आईचे नाव – प्रियंका जयंत बसेशंकर (मृतबालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी), 3 – आईचे नाव – योगिता विकेश धुळसे (मृतबालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा), 4- आईचे नाव – सुषमा पंढरी भंडारी (मृतबालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया), 5 – आईचे नाव – गिता विश्वनाथ बेहरे (मृतबालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा), 6 – आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी), 7 – आईचे नाव – सुकेशनी धर्मपाल आगरे (मृतबालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी), 8 – आईचे नाव – कविता बारेलाल कुंभारे (मृतबालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर), 10 – आईचे नाव – वंदना मोहन सिडाम (मृतबालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा), 10 – अज्ञात (मृतबालक-पुरुष).
संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे. यामध्ये 1 – आईचे नाव – शामकला शेंडे (बालक-स्त्री), 2 – आईचे नाव – दीक्षा दिनेश खंडाते (बालक – स्त्री (जुळे), 3 – आईचे नाव – अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री), 4 – आईचे नाव – चेतना चाचेरे (बालक-स्त्री), 5 – आईचे नाव – करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री), 6 – आईचे नाव – सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री).
बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थपन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश..
Next articleभंडारा घटनेच्या चौकशीचे आदेश; वाचलेल्या बालकांवर उपचार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here