
आशाताई बच्छाव
पुणे ,(प्रतिनिधी मयुर चव्हाण )- बनावट एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी,
संबंधितावर तातडीने कारवाई करा असा जिल्हा प्रशासनाचा आदेश असतानाही कारवाई ही का होत नाही आहे, पुणे हवेली दस्त नोंदणी कार्यालय १९ येथे बनावट दस्त नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता, जिल्हा प्रशासनाचा कारवाईचा आदेश असतानाही कारवाई होत नाही यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे का असा दाट संशय येत आहे, वडगाव शेरी येथील शेतजमीन एकाकडे घाणवट ठेवली असून तिची परस्पर विक्री झाली आहे पूर्ण दस्तावेज हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आले असून त्यामध्ये एनए ऑर्डर ही बनावट असल्याचे समोर आले होते, तरीही कारवाई काहीच झाली नाही तर याला जबाबदार कोण आहे प्रशासनाने याचे उत्तर द्यावे बनावट दस्त प्रकरणी गरीब शेतकरी जनतेचे हाल होत आहे, याबाबत सह जिल्हानिबंधक एम. बी .खामकर साहेब यांनी हवेली क्रमांक 19, च्या सहदुय्यम निबंधकांना पत्र पाठवून देखील पुढील कारवाई होत नाहीये याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.