आशाताई बच्छाव
दापोडीत चांदीच्या पालखीमधून ग्रामदैवत फिरंगाई देवीची मिरवणूक- गाव जत्रेला उत्साहात सुरुवात
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
जुनी सांगवी,ता.१० दापोडी ग्रामदैवत श्री फिरंगाईदेवी उत्सवात उत्साहात सुरुवात करण्यात आली.
कुरकुंभ येथून येणा-या फिरंगाईदेवीच्या पालखीचे समस्त गावक-यांनी उत्साहात स्वागत केले.
चांदीच्या पालखीतून सवाद्य मिरवणूकीत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दापोडी मध्ये श्री फिरंगाई देवी चा उत्सव सालाबाद प्रमाणे केला जातो.श्री फिरंगाई देवी मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. प्रथम सायंकाळी, दौंड येथील कुरकुंभ या गावी जाण्यापूर्वी श्रीच्या पालखीचे दापोडी येथील चव्हाटा येथील मारूती मंदिर येथे महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.महिलांनी देवीच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर आलेल्या सर्व ग्रामस्थांचा व भजनी मंडळाचा सन्मान करण्यात आला. सकाळी कुरकुंभ येथे ,मान्यवरांच्या शुभहस्ते कुरकुंभ या गावी सकाळी चार वाजता देवीची महापूजा करण्यात आली. दापोडी येथे कुरकुंभ येथुन येणाऱ्या श्री फिरंगाई देवीची पालखीचे स्वागत करण्यात आले. श्री फिरंगाई देवी मंदिरात महाआरती करण्यात आली. बाळगोपाळांसाठी आनंद मेळा, निकाली कुस्त्यांचे आयोजन, मनोरंजनात्मक कार्यक्रम जत्रे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा लावण्यांचा कार्यक्रम लावण्या जल्लोष अप्सरांचा
छबिना सोहळा यावेळी शिवाजी पुतळाच्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या खेळण्या व खेळणी विक्रीसाठी वेगवेगळ्या गावातून नागरिक आले होते विविध ढोल ताशाचे नगारा बँड दानपट्ट्याचे पथके सहभागी होते त्यानंतर खेळ लाल मातीतला आखाडा रेल्वे स्टेशन मागे शितळादेवी चौकात भरवण्यात आला या मध्ये विशेष कुस्तीसाठी रोख रक्कम ,३.५१.३३३/ हजार रुपये याचे बक्षीस व यामध्ये काही निवडक कुस्तीचे सामने होणार आहे कुस्ती पैलवान पै.,पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी सैन्यदल घोरपडी विरुद्ध पै.प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावेश तालीम कोल्हापूर या दोघांमध्ये विशेष कुस्ती होणार आहे विशेष महिलांच्या कुस्तीचे सुद्धा नियोजन करण्यात व तसेच अनेक गावामधून कुस्तीपटू सुद्धा येणार आहे व त्यांच्या कुस्तींचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे तसेच यावेळी११/४./२०२५ सकाळी १०वाजता ,सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील हिचा लावण्याचा कार्यक्रम ,शाहीर शैलेश लोखंडे प्रस्तुत लावण्य मंद मंजिरी व रविवारी सायंकाळी सात वाजता अजिंक्य झांबरे प्रस्तुत जल्लोष अप्सरांचा मनोरंजन कार्यक्रम होणार आहे यावेळी श्री फिरंगाई देवी उत्सव कमिटी अध्यक्ष ,ऋषभ काटे यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थ आजी-माजी नगरसेवक यांचा सन्मान करण्यात आला






