Home गडचिरोली नागरिकांच्या विविध समस्यावर गाजली नगर परिषदेची आढावा बैठक

नागरिकांच्या विविध समस्यावर गाजली नगर परिषदेची आढावा बैठक

153

आशाताई बच्छाव

1001400727.jpg

नागरिकांच्या विविध समस्यावर गाजली नगर परिषदेची आढावा बैठक

आम. डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतला शहराचा आढावा

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- 

नगर परिषद गडचिरोलीची आढावा बैठक आज ८ एप्रिल २०२५ रोजी आम. डॉ मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, , भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर यनगंधलवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई शेडमाके, नप चे माजी सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, गडचिरोली चे तहसीलदार संतोष आष्टीकर, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उपवन संरक्षक पाटील, पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगणझुडे, सार्व. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मोरे, उप अभियंता मेश्राम, सहाय्यक नगर रचनाकार भूषण काळोखे, भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक योगेश कांबळे, माजी नगरसेवक केशव निंबोड , अनिल करपे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, वैष्णवी नैताम, युवा मोर्चा चे महामंत्री मंगेश रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, देवाजी लाटकर , विनोद देवोजवार तसेच नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील भूमिगत गटार लाइन पूर्ण होऊन 4 वर्ष झाली मात्र राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी नाहरकत प्रमाणपत्र न दिल्याने सदर ठेकेदाराने मुख्य पाईप लाइन जोडलेली नाही त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे सदर काम यथाशिग्र पूर्ण करण्याच्या सूचना माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी दिल्या. तसेच फुटलेल्या नळ पाइपलाइन ची दुरुस्ती करणे, वाढीव विद्युत पोल मंजूर करणे तथा ओपनस्पेस भागातील बगीच्याची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करणे इत्यादी विषय प्रमोदजी पिपरे यांनी उपस्थित केले. तर माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सिटी सर्वे त्वरित करणे, घरकुल मंजूर करणे, नाल्याच्या उपसा नियमित करणे, अंतर्गत विद्युत लाइन चे केबल टाकने, ओपन स्पेसवर बगीचा तयार करणे, तलावाचे सौंदर्यीकरण करणे हे विषय उपस्थित केले.या सर्व विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आम डॉ नरोटे यांनी सर्व विषय तातडीने सोडविण्याचे सूचना मुख्याधिकाऱ्यांना तथा संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत शहरातील विविध समस्या, अडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यात नळाची पाईपलाईन दुरुस्ती,अत्यल्प पाणीपुरवठा, नवीन घर बांधकामास मंजुरी, शहरातील मुख्य मार्गावरील बंद पथदिवे, बंद हॉयमास्ट लाईट, ट्रॅफिक सिग्नल दुरूस्ती, उंच डीवायडर बांधकाम, नाल्यांची स्वच्छता नियमित करणे तसेच अंडर ग्राऊंड नाली व गटार लाइन चे रखडलेले काम इत्यादी विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आम. मिलिंद नरोटे यांनी नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवून इतर प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून शहर विकासाला चालना देऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासनाला दिले. बैठकीला शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleलोकशाही दिनालाच नागरिकांच्या निवेदनाला दाखवली केराची टोपली !
Next articleमंडळ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सातेफळ येथील विधवा महिलेकडुन आत्मदहनाचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.