Home जालना मंडळ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सातेफळ येथील विधवा महिलेकडुन आत्मदहनाचा इशारा

मंडळ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सातेफळ येथील विधवा महिलेकडुन आत्मदहनाचा इशारा

321

आशाताई बच्छाव

1001400746.jpg

मंडळ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सातेफळ येथील विधवा महिलेकडुन आत्मदहनाचा इशारा

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील गट 383/1 मधून नियमात नसतांनाही कुंभारझरी मंडळाच्या मंडळ अधिकाऱ्यांकडून रस्ता देण्याची मागणी केली जात आहे. मात्र हा रस्ता नियमबाह्य असल्याचे सांगत विधवा महिलेने मंडळ विरोधात मानसिक त्रास दिल्या प्रकरणी मा जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ 18 मार्च लेखी निवेदनात आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

या संदर्भात सातेफळ येथील सत्यभामा गजानन बनकर या विधवा महिलेने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,मौजे सातेफळ गट क्रमांक 383/1 मधील शेत जमिनीकरता पूर्व पश्चिम बांधाने रस्ता मोकळा करून देण्यासाठी जाफराबाद तहसीलदार यांचा आदेश पारीत असतांना गैरअर्जदार कुंभारझरी मंडळाचे मंडळ अधिकारी यांनी संबधित गैरअर्जदार शेतकरी यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण करून धमकावून ,दमदाटी करून माझ्या शेत जमिनीच्या मध्य भागातून रस्ता द्या अन्यथा बरे वाईट होईल असे धमकावत आहे.माझे सासू सासरे ,व पती वारले असून मी दोन चिमुकल्याचा रोजमजुरी करून उदरनिर्वाह भागवत आहे.यांचा फायदा गैरअर्जदार घेत असुन मला आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याचे संबधित महिलेने जिल्हाधिकारी ,तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

Previous articleनागरिकांच्या विविध समस्यावर गाजली नगर परिषदेची आढावा बैठक
Next articleशिर्डी, शनी शिंगणापूर परिसराचा विकास करण्यात येणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.