Home उतर महाराष्ट्र टिटाण्यात आज पासून चंडिका माता यात्रा उत्सवाला सुरुवात.

टिटाण्यात आज पासून चंडिका माता यात्रा उत्सवाला सुरुवात.

199

आशाताई बच्छाव

1001400759.jpg

धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ –टिटाण्यात आज पासून चंडिका माता यात्रा उत्सवाला सुरुवात. तगतराव मिरवणूक. लोकनाट्य तमाशा व कुस्त्या यांचे भव्य आकर्षक. साक्री तालुक्यातील. टिटाणे. येथील चंडिका माता देवीच्या यात्रे उत्सवाला. दिनांक 11 एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे. गावाच्या ग्रामपंचायतीतर्फे यात्रेनिमित्त साफसफाई करण्यात आलेली आहे. चंडिका माता देवी. अनेक कुळांची कुळदैवत व टिटा णे गावाचे ग्रामदेवी आहे. जागृत देवी आहे . चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. तिथीनुसार यात्रा उत्सव दरवर्षी होत असतो. तिथीच्या एक दिवसा आधी मान.मानता उतरवत असतात. कुलदैवत बाहेरून येणारे आणि परिसरातील हजारो लोकांचे भावना व श्रद्धा आहे देवीला बोकडाची मानता उतरत असते. तसेच चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे दिनांक 12 एप्रिल तिथीला यात्रा उत्सव ला प्रारंभ होईल मोठ्या संख्येने भावी भक्त उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते मोठ्या संख्येने व्यवसायिक येत असतात खेळणी संसार उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत सकाळी नऊ वाजता तगतराव मिरवणूक व तीन वाजता देवीला तगतराव रथाची प्रदक्षिणा होईल देवीची पूजा आणि कार्यक्रम रात्री मनोरंजनासाठी भीमा नामा अजनाडेकर यांचा लोक लोकनाट्य तमाशा सकाळी कुस्त्यांची दंगल. तरी शिस्तीत दर्शन नवस्फूर्तीचे सर्व विधी व धार्मिक कार्यक्रम शिस्तीत पार पाडावे. असे आव्हान. सामाजिक कार्यकर्ते माननीय रवींद्र देवरे, युवा नेते प्रशांत देवरे, युवा नेते चंद्रकांत देवरे, श्रीराम समितीचे अध्यक्ष किरण देवरे स्वराज्य संघटनेचे जगदीश देवरे. संपूर्ण यात्राचे नियोजन यांनी केले असून. यात्रा शांततेत निर्भग्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यांनी केले आहे.

Previous articleशिर्डी, शनी शिंगणापूर परिसराचा विकास करण्यात येणार
Next articleसुझलाँन कंपनीचा गलथान कारभार, शाँर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.