आशाताई बच्छाव
क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त
भव्य रक्तदान शिबीर
बदनापूर/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: बदनापूर शहरातील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा ज्योतीबा
फुले उत्सव समितीच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले
जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर १० एप्रिल रोजी घेण्यात आले. या
शिबिरात २५ युवकानी रक्तदान करुन एक सामाजिक संदेश दिला असून जयंती
उत्सवातून सामाजिक बांधिलकी जोपसणार असल्याचे ही उत्सव समितीकडून
सांगण्यात आले.
दरम्यान उद्या सायकली मिरवणूक तर १२ एप्रिल रोजी सावता मंदिर परिसरात
भव्य वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत-जास्त
समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ाहात्मा ज्योतीबा फुले उत्सव
समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००००
फोटो ओळी….
१०- बदनापूर शहरातील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा ज्योतीबा फुले
उत्सव समितीच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त
भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी रक्तदाते.
००००००००






