आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे बांबू मैन श्री रणजित जी गुळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा नेशनल बांबू मिशन या उपक्रमावर्ती गेली २ वर्षापासून मोठ्या चिकाटीने काम करणारे पर्यावरण रक्षक म्हणून काम करणारे अग्रिहिता ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष रणजित जी गुळवे सरांचा वाढदिवस अगदी साधारण पद्धतीने साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या दिवशी त्यांनी बांबूचे १०० प्लांट लाऊन एक आगळा वेगळा मेसेज सर्वांना दिला आहे वाढदिवसानिमित्त विनाकारण खर्च करण्यापेक्षा तो खर्च वाचवून आपण जर निसर्गावर पर्यावरण वाचवण्यावर तो खर्च केला तर नक्कीच याचा फायदा सर्वांना होणार आहे असे ते बोलताना म्हणाले आज दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे कार्बन चे हवेतील प्रमाण वाढले आहे आणि ऑक्सिजन कमी होत चालला आहे आणि यामुळे जगाला ग्लोबल वॉर्मिंग ला सामोर्य जावे लागत आहे आज हवेतील प्रदूषण एवढे वाढले आहे की आज बऱ्याच ठिकाणचे तापमान हे ५० डिग्री क्रॉस केलेले आहे आणि यावर जर आपल्याला कंट्रोल आणायचे असेल तर यावर फक्त येकच पर्याय आहे तो म्हणजे जास्तीत जास्त झाडे लागली गेली पाहिजे आणि त्याचे संगोपन ही झाले पाहिजे आज बांबू चे झाडे लावली तर बांबू हे जास्त ऑक्सिजन सोडते आणि जास्तीत जास्त कार्बन खेचून घेते मानवाला जगण्यासाठी एका वर्षामध्ये २८० केजी ऑक्सीजन लागतो आणि बांबूचे एक रोप ३२० केजी ऑक्सिजन आपल्याला देते असे बोलताना त्यांनी सांगितले आणि येणाऱ्या काळात जर जगाला ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येपासून जर आपल्याला वाचवायचे असेल तर जास्तीत जास्त बांबू लागवडीकडेशेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले या वाढदिवसा प्रसंगी अग्रिहिता ग्रुप चे सीएमओ प्रशांत नागणे फाउंडर लीडर डीएसपी सर आणि लोखंडे सर यांनी उपस्थिती दर्शवली






