Home नांदेड गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी

123

आशाताई बच्छाव

1001397873.jpg

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 9 एप्रिल :- “AI हे सध्याच्या काळात प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महसूल, नागरी सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे. कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराबाबत माहिती करून त्यांचा शासकीय कामकाजात प्रभावीपणे वापर करावा. तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय कामकाजात आधुनिक कार्यक्षमता, अचूकता आणि पारदर्शकता येईल. गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या नियोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले. नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज नियोजन भवन येथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे त्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजात AI चा प्रभावी वापर कसा करता येईल हे समजावणे हा आहे.

आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, सहाय्यक जिल्हा माहिती व सूचना अधिकारी प्रदीप डुमणे, तहसिलदार विपीन पाटील, माहिती तंत्रज्ञ निलावार तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना AI म्हणजे काय, त्याची कार्यप्रणाली, विविध सरकारी विभागांतील कामकाजात वापर, डेटा विश्लेषण, डिजिटल कागदपत्रांचे व्यवस्थापन, नागरी सेवा सुधारणा अशा विविध बाबीची माहिती व सादरीकरण उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण अंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून एनआयसीचे सहाय्यक जिल्हा माहिती सूचना अधिकारी प्रदीप डुमणे व संतोष निलावार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण सत्रात प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनीही याचा सकारात्मक अनुभव व्यक्त केला आणि भविष्यात त्यांच्या विभागातील कामात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दर्शवली.

AI तंत्रज्ञानाची मुलभूत माहिती, शासकीय कामकाजातील उपयोग, चार्टजीपीटी सारख्या सहाय्यक प्लॅटफार्मचा वापर, डेटा विश्लेषण आणि निर्णय या प्रक्रीयेतील मदत याबाबींवर सखोल मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. तसेच या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Previous articleबांबू मैन श्री रणजित जी गुळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
Next articleBIG NEWS खळबळ ! बुलढाण्यातील इंदिरा नगरातून शॉर्ट गन रायफल जप्त ! – 3 दुचाक्याही हस्तगत, शहर पोलिसांची कारवाई!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.