Home अमरावती भाऊसाहेब देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथी सोहळ्यात पालकमंत्र्यांचे बावनकुळे यांचे मत.

भाऊसाहेब देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथी सोहळ्यात पालकमंत्र्यांचे बावनकुळे यांचे मत.

135

आशाताई बच्छाव

1001401473.jpg

भाऊसाहेब देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथी सोहळ्यात पालकमंत्र्यांचे बावनकुळे यांचे मत. समाजासाठी झटणाऱ्या माननीय व्यक्तिमत्वाचे स्मरण भारतरत्नाची मागणी पुन्हा केली. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव केला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला संस्थाध्यक्ष व माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री अमरावती जिल्हा सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी भाऊ साहेबांच्या बहुआयामी कार्याचा गौरव केला ते म्हणाले की डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांनी शेती, कृषी, अध्यात्म, समाजकारण आणि राजकारण या सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मी माजी विद्यार्थी असल्याचे सांगून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वोत्तर मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बळवंतराव वानखडे, आमदार सुलभा खोडके, प्रवीण तायडे यांनीही विचार मांडले. समरूपात हर्षवर्धन देशमुख यांनी भाऊसाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा केली. दरम्यान डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न मिळावा यासाठी नवा प्रयत्न सुरू झाला आहे तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागणीचे पालकत्व स्वीकारले आहे. या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठिंबा दिला असून त्यांनी सांगितले की सदर प्रस्ताव विधिमंडळात मांडून तो मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल केंद्रीय मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्याकडे ही मागणी जोरदारपणे मांडली जाईल अशी त्यांनी सांगितले.

Previous articleघरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
Next article“युवा मराठा” चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.